देवेंद्र फडणवीसांवर टीका करणाऱ्या विरोधकांचे सूर कसे बदलले?

एरवी राजकारणाच्या नजरेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जहरी टीका करणारे विरोधकही आता फडणवीसांचे कौतुक करताना दिसत आहेत. 

सोनेश्वर पाटील | Updated: Jan 3, 2025, 07:01 PM IST
देवेंद्र फडणवीसांवर टीका करणाऱ्या विरोधकांचे सूर कसे बदलले? title=

Maharashtra Politics : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्र स्विकारली आणि आपल्या कार्यशैलीची चुणूक दाखवायला तत्परतेनं सुरुवातही केली. त्याचे परिणाम लगेचच दिसून येऊ लागले. एरवी राजकारणाच्या नजरेतून फडणवीसांवर जहरी टीका करणाऱ्या विरोधकांचाही सूर आता बदलू लागलाय.

देवेंद्र फडणवीस विधानसभा निवडणुकीत सर्व विरोधकांना पुरुन उरले. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या राजकारणावर निर्विवाद वर्चस्व सिद्ध केलं आहे. त्यामुळं आता स्वकियांसह विरोधकांनाही देवेंद्र फडणवीस यांच्या राजकारणाची भूरळ पडू लागली आहे. देवेंद्र फडणवीस हे ओबीसी समाजासाठी खूप काम करत असल्याचं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.

सुप्रिया सुळेंकडून फडणवीसांचं कौतुक

देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक फक्त छगन भुजबळच करत नाहीत. तर देवेंद्र फडणवीस यांच्या कामाचं विरोधी पक्षातील नेत्या सुप्रिया सुळे देखील करत आहेत. महायुती सरकार अस्तित्वात आल्यापासून फक्त देवेंद्र फडणवीसच काम करताना दिसत असल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

हिच बाब शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची आहे. निवडणूक काळात उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेचे बाण सोडले होते. त्याच शिवसेनेला आता देवेंद्र फडणवीस धडाकेबाज वाटू लागले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकेकाळचे मित्र असल्याचंही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं म्हटलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्र हाती घेतल्यापासून अनेक धडाकेबाज निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठं बहुमत मिळालं. त्यानंतर देवेंद्र फडणवीसांच्या कामाचा वेग आणि झपाटा वाढलाय. त्यामुळेच महायुतीच्या नेत्यांसह विरोधी पक्षाचे नेतेही देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक करु लागलेत.

'सामना'मधून फडणवीसांच कौतुक

गडचिरोली हा महाराष्ट्राचा शेवटचा नाही तर पहिला जिल्हा म्हणून ओळखला जावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रयत्न करत आहेत. हे चुकीचे नाही. फक्त गडचिरोलीच्या विकासाचा विडा आणि तेथील सामान्य जनता आणि गरीब आदिवासी यांच्यासाठी देखील उचलला आहे, हे दाखवून देण्याची काळजी देवाभाऊंनी घ्यावी लागेल. नवीन वर्षाच्या सूर्यादयापासून गडचिरोलीच्या परिवर्तनाची सुरुवात झाली. हा त्यांदा वादा खरा होईल. बीडमधील बंदुकीचे राज्य जरी कायम असले तरी गडचिरोलीत संविधानाचे राज्य येत असेल तर मुख्यमंत्री फडणवीस कौतुकास पात्र आहेत. असं सामनाच्या अग्रलेखातून म्हटले आहे.