शिर्डी : दिवाळीचा पहिला दिवस शिर्डीकरांसाठी खास असतो. साईबाबांनी पाण्यांचे दिवे लावून दिवाळी साजरी केली होती. त्याचेच रूप मानून आज हजारो भाविकांनी मोठ्या श्रद्धेने साईबाबांच्या नंदादीप समोर मोठ्या प्रमाणात दिवे लावले. भक्तांनी लावलेल्या या श्रद्धेच्या दिव्यांनी संपूर्ण साईमंदिर परिसर लखलखून गेला आहे.
साईमंदिरामध्ये पारंपारिक पद्धतीने दिवाळी साजरी केली जाते. कागद आणि बांबूच्या कामट्या पासून तयार केलेला आकर्षक आकाश कंदील साईमंदिर परिसरात लावण्यात आला आहे. दिवाळीच्या या शुभ मुहर्तावर प्रत्येक जण मोठ्या उत्साहात दिप प्रज्वलीत करून शिर्डीत बाबांच्या सानिध्यात दिवाळी साजरी करतात.
साईबाबांना मानणारा मोठा भक्तवर्ग देश-विदेशात आहेत. आजच्या दिवशी खास अनेक जण साईंच्या दर्शनासाठी येतात.