जळगाव : राज्यात २ लाख ५६ हजार किलोमीटर ग्रामीण रस्ते असून त्या सगळ्यांचं नूतनीकरण करायचं ठरलं तर त्यासाठी सव्वा लाख कोटींची गरज लागेल मात्र एवढा निधी सरकारकडे उपलब्ध नाही, अशी माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पटील यानी दिली आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री रस्ता निधीतून दोन वर्षांत ३० हजार किलोमीटर रस्त्यांचं नूतनीकरण करण्यात येणार आहे, अशी माहितीही पाटील यांनी जळगावमध्ये दिली. रस्त्यांसाठी राज्य शासनाकडे वेगळा निधी उपलब्ध नसून त्याकरिता प्रत्येक जिल्ह्याच्या नियोजन समितीतून दहा पंधरा कोटी रुपये रस्त्यांसाठी काढण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचं यावेळी चंद्रकांत पाटलांनी म्हंटलंय.