जळगाव : जिल्हा रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयात वृद्ध महिलेचा शौचालयात मृत्यू झाल्याप्रकरणानंतर डीने डॉ. भास्कर खैरे यांचे निलंबन करण्यात आल्यानंतर आता जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. जळगाव जिल्हाधिकारीपदी सांगली येथील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नवनियुक्त जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना पदभार त्वरित स्वीकारण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
अभिजित राऊत यांच्या नावाची दोन दिवसांपासून चर्चा होती. दरम्यान, त्यांची जिल्हाधिकारी नियुक्ती झाल्याने या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. दोन वर्षांपूर्वी जिल्हाधिकारी म्हणून ढाकणे यांनी नियुक्ती करण्यात आली होती. सोलापूर येथे पालिका आयुक्त असताना अतिक्रमन करुन बांधण्यात आलेला मंत्र्याचा बंगला पाडण्याचे आदेश दिले होते. तेव्हापासून ते आक्रमक अधिकारी असल्याचे बोलले जात होते. मात्र, कोरोना काळात त्यांना येथील परिस्थिती हाताळताना अपयश आल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे.
#BreakingNews जळगावचे जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांची अखेर उचलबांगडी । जळगावच्या जिल्हाधिकारीपदी सांगली येथील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांची नियुक्ती
। राऊत यांना पदभार त्वरित स्वीकारण्याचे आदेश @ashish_jadhao pic.twitter.com/dFAdR2JIqW— ZEE २४ तास (@zee24taasnews) June 18, 2020
कोरोनाबाधित वृद्ध महिलेचा शौचालयात मृत्यू झाल्यानंतर जिल्हा प्रशानसानवर टीका होवू लागली होती. हे प्रकरण डॉक्टर आणि अधिकाऱ्यांना चांगलेच महागात पडले आहे. सरकारने पाच जणांना निंलबित करण्याचे आदेश दिले होते. यात महाविद्यालयाचे डीन आणि काही अधिकारी , तीन डॉक्टरांना निलंबित करण्यात आले होते. आता जिल्हाकारी ढाकणे यांची बदली करण्यात आली आहे.