मराठवाड्यातील जायकवाडी धरणासाठी उत्तर महाराष्ट्रातून पाणी, शेतकरी संतप्त

आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यात पोलीस बंदोबस्त.

Updated: Oct 25, 2018, 10:32 PM IST
मराठवाड्यातील जायकवाडी धरणासाठी उत्तर महाराष्ट्रातून पाणी, शेतकरी संतप्त title=

अहमदनगर : मराठवाड्यात जायकवाडी धरणासाठी उत्तर महाराष्ट्रातून उद्यापासून पाण्याचा विसर्ग सुरू होणार आहे. नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यांमध्ये यासाठी प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. उद्यापसून सलग पाच दिवस पाणी सोडलं जाणार आहे. 

याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यात पोलीस बंदोबस्त असणं आवश्यक आहे. मात्र अद्याप पुरेसा बंदोबस्त करण्यात आलेला नाही. शिवाय नदीकाठच्या गावांनी पाणी उचलू नये, यासाठी या गावांचा वीजपुरवठा खंडीत करावा लागणार आहे. ही प्रक्रियाही अद्याप पूर्ण झाली नसल्याचं समजतंय. 

मात्र उद्या रात्रीपासून पोलीस बंदोबस्तात गोदावरीच्या पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येणार आहे. दुसरीकडे नगर जिल्ह्यातही प्रशासनानं तयारी सुरू केली असून भंडारदरा धरणातून साडेचार हजार क्युसेक्स पाणी प्रवरा नदीपात्रातून निळवंडेसाठी सोडण्यात आलंय. तिथून ते पाणी जायकवाडीसाठी सोडण्यात येईल.