Jitendra Awhad on akshay kumar for playing role chhatrapati shivaji maharaj : अवघ्या महाराष्ट्राचं दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महराजांचं पात्र 'वेडात मराठे वीर दौडले सात' (Vedant Marathe Veer Daudale Saat) या मराठी चित्रपटामध्ये बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमारने (Bollywood Actor akshay kumar) साकारलं आहे. महेश मांजरेकर निर्मित 'वेडात मराठे वीर दौडले सात' या चित्रपटामध्ये अक्षय कुमार महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. अक्षयने महाराजांच्या पेहरावातील व्हिडीओ शेअर केला. मात्र या व्हिडीओमध्ये अक्षय कुमारच्या मागे बल्ब असणारा झुंबर पाहायला मिळाले. यावरून सोशल मीडियावर अक्षय कुमारला आणि चित्रपट निर्मात्यांवर जोरदार टीका होताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही संताप व्यक्त केला आहे. (Jitendra Awhad on akshay kumar look playing role chhatrapati shivaji maharaj)
बल्बचा शोध कधी लागला. काय थट्टा लावली आहे. मराठी माणसाला येड्यात काढता आहेत, असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली आहे. याबाबत आव्हाड यांनी ट्विट केलं असून एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये अक्षय कुमारने शेअर केलेल्या व्हिडीओमधील हा फोटो असून त्यामध्ये अक्षयच्या मागे झुंबरला बल्ब लावलेले दिसत आहेत.
जेव्हा या चित्रपटामध्ये अक्षय कुमार महाराजांची भूमिका करणार असल्याचं समोर आल्यावर सर्वांना याची उत्सुकता होती. मात्र अक्षयचा लूक हा नेटकऱ्यांना काही पचनी पडला नसल्याचं दिसत आहे. कारण सोशल मीडियावरही नेटकऱ्यांना अक्षय कुमारला ट्रोल केलं आहे.
बल्ब चा शोध कधी लागला..काय थट्टा लावली आहे … मराठी माणसाला येड्यात काढता आहेत pic.twitter.com/GRHG1cwQBU
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) December 7, 2022
दरम्यान, 'वेडात मराठे वीर दौडले सात' या मराठी चित्रपटात जय दुधने, उत्कर्ष शिंदे, विशाल निकम, विराट मडके, हार्दिक जोशी, सत्या, अक्षय, नवाब खान आणि प्रवीण तरडे यांच्याही भूमिका आहेत. वसीम कुरेशी निर्मित ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ हा चित्रपट 2023 च्या दिवाळीला मराठी, हिंदी, तामिळ आणि तेलुगु भाषेत थिएटरमध्ये दाखल होणार आहे.