-30 डिग्रीतही 160 Kmph वेग, जगातील सर्वात उंच पुलावरुन धावली वंदे भारत, थरारक Video पाहा

Kashmir 1st Vande Bharat Express: जम्मू-काश्मीरमध्ये वंदे भारत पहिल्यांदा धावणार आहे. जगातील सर्व उंच पुलावरुन धावली ट्रेन  

मानसी क्षीरसागर | Updated: Jan 25, 2025, 02:48 PM IST
-30 डिग्रीतही 160 Kmph वेग, जगातील सर्वात उंच पुलावरुन धावली वंदे भारत, थरारक Video पाहा title=
Kashmir 1st Vande Bharat Express Train Arrived in jammu Check Route Features

Kashmir 1st Vande Bharat Express: जम्मू-काश्मीरला वंदे भारतचं गिफ्ट मिळालं आहे. वंदे भारतची चाचणी आता पूर्ण झाली आहे. आज वंदे भारत जगातील सर्वात उंच पुलावरुन धावली आहे. जम्मू-काश्मीरसाठी वंदे भारत ट्रेन खास पद्धतीने डिझाइन करण्यात आली आहे. जेणेकरुन थंडीतही प्रवाशांना कोणतीही समस्या येणार नाही. 

जम्मू-काश्मीरमध्ये धावणाऱ्या वंदे भारत ट्रेनच्या खिडक्यांवर बर्फ कधीच साचणार नाही. उणे 30 मध्येही वंदे भारत सुपरफास्ट धावणार आहे. तसंच यात विमानातील काही फिचरदेखील जोडण्यात आले आहेज. जे अन्य वंदे भारत एक्स्प्रेसच्या तुलनेत खास आहेत. जाणून घेऊयात वंदे भारत एक्स्प्रेसचे फिचर्स आणि तिकीट दर काय आहेत. 

शुक्रवारी संध्याकाळी काश्मीरसाठी धावणाऱ्या या ट्रेनची जम्मू स्टेशनवर चाचणी झाली. जम्मू पोहोचताच या ट्रेनच्या बाबतीत प्रवाशांमध्ये उत्सुकता दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच या ट्रेनचे लोकार्पण करणार आहेत. ही ट्रेन कटडा-बारामूला मार्गावर धावणार असून उत्तरेकडील रेल्वे विभागाकडून चालवण्यात येणार आहे.  

केव्हापासून धावणार ही ट्रेन?

ही ट्रेन माता वैष्णो देवी कटरा दिल्लीला जोडणाऱ्या दोन्ही मार्गावर यश मिळाल्यानंतर ही या परिसरातील तिसरी वंदे भारत ट्रेन असणार आहे. भगवा आणि ग्रे रंगाची ही अत्याधुनिक ट्रेन माता वैष्णो देवी कटरा आणि श्रीनगर दरम्यान धावणार आहे. ही ट्रेन अंजी खाद ब्रिज जो भारतातील पहिला केबल स्टेड रेल ब्रिज असून आहे आणि चेनाब ब्रिज जो जगातील सर्वात उंच रेल्वे पुलावरुन धावणार आहे. पुढील महिन्यापासून ही ट्रेन रुळांवर धावण्याची शक्यता आहे. रेल्वे प्रशासनाने अद्याप याची तारीख आणि वेळ जाहीर केली नाहीये. 

या ट्रेनची खासियत काय?

ट्रेनचे डिझाइन आणि गती चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्ट्रीमध्ये वंदे भारत तयार करण्यात आली आहे. जम्मू- काश्मीर वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनमध्ये अनेक लग्झरी सुविधा आणि फिचर्स आहेत. श्रीनगर वंदे भारत एक्स्प्रेस खास बनवण्यासाठी ट्रेनच्या कोचमध्ये वॉटर टँक सिलिकॉन हिटिंग पॅड, हिटींग प्लंबिग पाईप लाइन लावण्यात आले आहेत. हे दोन्ही थंडीच्या काळात पाण्याचा बर्फ होण्यापासून रोखते. नवीन वंदे भारतच्या ड्रायव्हर केबिनमध्ये ट्रिपल एअर विंड स्क्रीन देण्यात आली आहे. 

किती असेल तिकीट?

तिकीटच्या किंमतीत किती असेल याची माहिती अद्याप समोर आलेली नाहीये. मात्र, अंदाजानुसार 1,500 -1,600 रुपये आणि एक्झिक्युटिव्ह चेअर कारसाठी 2,200 - 2,500 रुपये असू शकते.