कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्तपदी डॉ. विजय सूर्यवंशी यांची नियुक्ती झालीय. पदभार स्वीकारल्यावर लगेच सूर्यवंशी यांनी फेरीवाल्यांविरोधात मोहीम छेडली आहे. आयुक्तांनी काल रात्री अचानक कल्याण डोंबिवली स्कायवॉक परिसरात धडक दिली. कल्याण डोंबिवली स्थानक परिसरात फेरीवाल्यांचा गराडा पडला आहे. त्यामुळे फेरिवाल्यांविरोधात काय कारवाई होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
फेरीवाल्यांवरच्या कारवाईत हलगर्जीपणा केल्यामुळे आयुक्तांनी महापालिकेच्या ३ कर्मचाऱ्यांना निलंबित देखील केलं आहे.
कल्याण-डोंबिवलीत फेरीवाल्यामुळे फुटपाथवर चालण्यासाठी जागा नाही. दुकानवाले फूटपाथवर अतिक्रमण करुन आणखी रस्ते अरुंद करत आहेत. कल्याण स्टेशन परिसर तर फक्त रिक्षांनी भरलेलं असतं. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतून कोंडीची समस्या आहे.
केडीएमसीचे नवे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी कल्याण आणि डोंबिवली स्टेशन परिसरात अचानक भेट देऊन येखील समस्या पाहिल्या. स्कायवॉकवर चालणं किती कठीण झालं आहे याची पाहणी त्यांनी केली. त्यामुळे कल्याण-डोंबिवलीकरांच्या नव्या आयुक्तांपासून अपेक्षा वाढल्या आहेत.