संततधार पावसाने माळशेज घाटात दरड कोसळली, वाहतूक कोंडी

Landslide at Malshej Ghat due to heavy rains : सह्याद्रीच्या पर्वतरांगा परिसरात पावसाची संततधार सुरुच असून मुसळधार पावसामुळे कल्याण-अहमदनगर महामार्गावरील मोरोशी नजिक दिवाणपाडा येथे दरड कोसळली.  

Updated: Jul 13, 2022, 03:20 PM IST
संततधार पावसाने माळशेज घाटात दरड कोसळली, वाहतूक कोंडी title=

हेमंत चापुडे / पुणे :  Landslide at Malshej Ghat due to heavy rains : सह्याद्रीच्या पर्वतरांगा परिसरात पावसाची संततधार सुरुच असून मुसळधार पावसामुळे कल्याण-अहमदनगर महामार्गावरील मोरोशी नजिक दिवाणपाडा येथे दरड कोसळली. सुदैवाने या दुर्घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नाही. मात्र दरड कोसळल्याने महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. या वाहतूक कोंडीत रुग्नवाहिका अडकून पडली. सध्या एकेरी वाहतूक सुरु असून टोकावडे पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. 

हडपसर मुंढवा रोडवर वाहतूक कोंडी

तसेच पुण्यातील हडपसर मुंडवा रोड वरती वाहतूक कोंडी झाली आहे. पडत असलेल्या पावसामुळे रस्त्यावरती खड्डे पडले आहेत. वाहतूक कोंडी झाल्याने नागरिकांचे हाल सहन करावे लागत आहे.

लोणावळयातील भूशी धरणावर  पर्यटकाना बंदी 

लोणावळयातील भूशी धरणामध्ये पाण्याचा प्रवाह वाढल्याने पर्यटकाना धरणावर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. सायंकाळी 5 नंतर भुशी धरणाकड़े जाणारे रस्ते बंद करण्यात येणार आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून खबरदारी घेण्यात येत आहे. भूशी धरणातील पाण्याचा प्रवाह वाढल्याने प्रशासनाने हा घेतला निर्णय घेतला आहे.