Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचे क्षणोक्षणाचे अपडेट्स जाणून घ्या एका क्लिकवर
16 Feb 2025, 13:27 वाजता
कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक जण भाजपात पक्ष प्रवेश करणार - मंत्री चंद्रकांत पाटील
पक्ष प्रवेशासंदर्भात मंत्री चंद्रकांत पाटील यांचे मोठे विधान केलंय. आगामी काळात कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक जण भाजपात पक्ष प्रवेश करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. खासदार धनंजय महाडिक यांनी भाजपामध्ये येणाऱ्या नेत्यांची नावे दिली आहेत, ती नावे प्रदेशाध्यक्ष बावन्नकुळे यांना दिली आहेत. त्यांचे पक्ष प्रवेश झाले तर भाजपा अधिक बळकट होईल. मग कोणी काळी जादू केली तरी काही फरक पडणार नाही असं विधान मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाजप पदाधिकारी मेळाव्यात केलंय.
16 Feb 2025, 12:04 वाजता
Maharashtra Breaking News LIVE Updates: निधीअभावी मुंबईतील 32 प्रस्तावित रेल्वे स्थानके कागदावरच आहेत. मध्य, पश्चिम रेल्वेवर स्थानकांना तत्त्वतः मंजुरी देण्यात आलीय. मात्र निधीची तरतूद नसल्याने या कामांना विलंब होत आहे.
16 Feb 2025, 11:28 वाजता
Maharashtra Breaking News LIVE Updates: कुणालाही कुणाची राजकीय गरज राहिलेली नाहीः भास्कर जाधव
शिवसेना UBT पक्षाचे नेते भास्कर जाधव नाराज असल्याची चर्चा असताना त्यांनी आज पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली आहे. आपले सहकारी आपल्या सोबत राहिले पाहिजेत अशी भूमिका मी मांडली, असं जाधव म्हणाले आहेत.
16 Feb 2025, 11:05 वाजता
Maharashtra Breaking News LIVE Updates: 'महाकुंभ'ला जाऊ न शकलेल्या नागरिकांसाठी नागपुरात खास आयोजन
प्रयागराजला जाऊ शकत नाही, त्यांच्यासाठी संगमातून एक लाख लिटर पवित्र जल नागपुरात आणण्यात आले आहे... "महाकुंभ प्रयाग योग, पुण्य आले आपल्या दारी" या आशयाने हे कार्यक्रम नागपूरच्या रेशीमबाग येथील मैदानावर आयोजित करण्यात आले आहे. त्यामुळे जे भाविक प्रयागराज ला जाऊ शकलेले नाही, अशा भाविकांसाठी खास पवित्र स्नानाची अनुभूती नागपूरातच होत आहे. विशेष म्हणजे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कार्यक्रम स्थळी विशेष पूजन व महाआरती करण्यात आली आहे
16 Feb 2025, 10:31 वाजता
Maharashtra Breaking News LIVE Updates: मुंबईतील मस्जिद बंदर येथे इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू
मस्जिद बंदर येथे इमारतीला भीषण आग लागल्याची माहिती समोर येत आहे. इमारतीच्या मिटर बॉक्सला आग लागली असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या आगीत दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. तर एक जखमी आहे.
16 Feb 2025, 10:28 वाजता
Maharashtra Breaking News LIVE Updates: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातला आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे.देशमुखांच्या हत्येला 67 दिवस पूर्ण झालेत.. मात्र तरीही आंधळे पोलिसांना सापडलेला नाही.. त्याचा शोध पोलीस, सीआयडीची पथकं घेताहेत. बीड पोलिसांनी त्याला फरार घोषित केलंय..आंधळेची माहिती देणा-याला बक्षीस मिळेल, असंही पोलिसांनी जाहीर केलंय. मात्र तरीही आंधळेचा पत्ता अद्याप लागला नाहीये..
16 Feb 2025, 09:54 वाजता
Maharashtra Breaking News LIVE Updates: कोकणातील डॅमेज कंट्रोल करण्यासाठी ठाकरे अॅक्शन मोडवर
कोकणातील डॅमेज कंट्रोल करण्यासाठी ठाकरे अॅक्शन मोडवर. राजन साळवींच्या शिवसेना पक्षप्रवेशानंतर आज सेनाभवन इथे बैठक . सेनाभवनात राजापूर मतदारसंघातील पदाधिका-यांची बैठक. संध्याकाळी 5 वाजता बैठकीचं आयोजन
16 Feb 2025, 09:13 वाजता
Maharashtra Breaking News LIVE Updates: GBSचा कोल्हापुरात दुसरा बळी
GBSचा कोल्हापुरात दुसरा बळी. रेंदाळ ढोणेवाडीत वृद्धाचा GBSमुळे मृत्यू. एक रुग्ण व्हेंटिलेटरवर
16 Feb 2025, 09:11 वाजता
Maharashtra Breaking News LIVE Updates: लाडक्या बहिणींची संख्या कमी होणार?
लक्ष वेधून घेणारी बातमी आहे ती लाडकी बहीण योजनेची. लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची संख्या आणखी कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. अडीच लाखांहून अधिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिलांना वगळलं जाण्याची शक्यताय. उत्पन्नाच्या माहितीसाठी आयकर विभागाची मदत घेण्यात येतेय.
16 Feb 2025, 09:09 वाजता
Maharashtra Breaking News LIVE Updates: दिल्लीत मुख्यमंत्र्यांचे नाव निश्चित करण्यासाठी, भाजपच्या निरीक्षकांची घोषणा आज होण्याची शक्यता. पक्ष मुख्यालयात बैठकांचं सत्र. 18 फेब्रुवारीला आमदारांची बैठक होण्याची शक्यता.