Maharashtra Breaking News LIVE Updates: अजित पवारांची प्रकृती बिघडली; नाशिकमधील पुढील कार्यक्रम रद्द

Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचे क्षणोक्षणाचे अपडेट्स जाणून घ्या एका क्लिकवर  

Mansi kshirsagar | Feb 16, 2025, 21:59 PM IST
Maharashtra Breaking News LIVE Updates: अजित पवारांची प्रकृती बिघडली; नाशिकमधील पुढील कार्यक्रम रद्द

Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचे क्षणोक्षणाचे अपडेट्स जाणून घ्या एका क्लिकवर

 

16 Feb 2025, 21:58 वाजता

अजित पवारांची प्रकृती अचानक बिघडली आहे.  नाशिकमधील पुढील कार्यक्रम त्यांनी रद्द केले आहेत. अजित पवार ओझरहून पुण्याकडे रवाना झाले आहेत. भाषणात देखील त्यांनी प्रकृती बिघडली असल्याचं  वक्तव्य केलं आहे. 

16 Feb 2025, 20:34 वाजता

स्फोट दुर्घटनेची सखोल चौकशी करण्याचे जिल्हा प्रशासनाला निर्देश

काटोल तालुक्यातील कोतवालबड्डी येथील एशियन फायर वर्क्स बारूद कंपनीमध्ये स्फोट होवून या दुर्दैवी घटनेत दोन कामगारांचा मृत्यू झाला. काहीजण जखमी झाले आहेत. या प्रकरणाची शासनाने गंभीर दखल घेतली असून सखोल चौकशी करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे जिल्हा प्रशासनाला दिले.

16 Feb 2025, 19:38 वाजता

राज्यात आता डॉक्टर आपल्या दारी मोहीम

'सरकार आपल्या दारी'नंतर राज्य सरकार मुंबईकरांच्या आरोग्यासाठी डॉक्टर आपल्या दारी ही मोहीम राबवणार आहे. याअंतर्गत डॉक्टर घरी येणार आणि औषध देणार, अशी माहिती 
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

16 Feb 2025, 18:32 वाजता

4 महाकुंभमेळा विशेष गाड्या चालवणार 

रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी आणि महाकुंभमेळ्यादरम्यान अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी, रेल्वेने 4 महाकुंभमेळा विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. उत्तर रेल्वेकडून यासंदर्भात निर्णय घेण्यात आलाय. 

16 Feb 2025, 17:40 वाजता

पुण्यात युवक काँग्रेसचं हल्लाबोल आंदोलन 

नशा नको नोकरी द्या म्हणत पुण्यात युवक काँग्रेसने भव्य मोर्चा काढला. राज्य सरकार विरोधात युवक काँग्रेसच्या आक्रोश मोर्चाला पुण्यातील काँग्रेस भावनापासून सुरुवात झाली.  युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चीब यांच्या नेतृत्वात झालेल्या या मोर्चात राज्यातील बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न, युवक युवतींचे प्रशन यावेळी सरकारला विचारण्यात आले.

16 Feb 2025, 16:01 वाजता

​लव्ह जिहादचं वास्तव उघड होताच सुप्रिम कोर्टानंही घेतली दखल

लव्ह जिहादचं वास्तव उघड... सुप्रिम कोर्टानंही घेतली दखल.. खोट बोलून लग्न करणे आणि मूल जन्माला घालून सोडून देणे हे प्रकर गंभीर.. यावर करावाई गरजेची.. मुख्यंत्र्यांची भूमिका

16 Feb 2025, 15:58 वाजता

आमदार भास्कर जाधवांचं एक पाऊल मागे

शिवसेना UBTने क्षमतेप्रमाणे संधी दिली नाही असं कधीच म्हटलं नाही. आमदार भास्कर जाधवांचं एक पाऊल मागे...43 वर्षांच्या राजकीय जीवनात पदासाठी कधीही स्टंटबाजी केली नसल्याचा दावा

16 Feb 2025, 14:18 वाजता

उजनी धरणातून उद्या सकाळी भीमा नदीत पिण्यासाठी पाणी सोडले जाणार

उजनी धरणातून उद्या सकाळी भीमा नदीत पिण्यासाठी पाणी सोडले जाणार अशी माहिती उजनी धरण व्यवस्थापन विभागाने दिली आहे. सोलापूर महानगरपालिका, पंढरपूर,सांगोला, मंगळवेढा नगरपरिषद व भीमा नदीकाठच्या ग्रामपंचायतकरता पिण्यासाठी पाणी सोडण्यात येणार आहे. भीमा नदी काठच्या सर्व नागरीकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.  नदीपात्रात कोणीही उतरू नये आणि नदी मधील शेती पंप, नदी काठचे शेती अवजारे व तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ काढण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 

16 Feb 2025, 14:17 वाजता

मुंबईत पुन्हा भाषावाद; मॅनेजरकडून मराठी तरुणाला गुजराती किंवा हिंदीमध्ये बोलण्याची सक्ती 

रुपम शोरूम क्रॉफर्ड मार्केटच्या मॅनेजरने मराठी तरुणाला गुजराती किंवा हिंदीमध्ये बोलण्यास जबरदस्ती केल्याने पुन्हा मुंबईत मराठी विरुद्ध हिंदी भाषिक वाद समोर आला आहे. ही घटना मराठी तरुणाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दक्षिण मुंबईचे विभागप्रमुख संतोष शिंदे यांच्या कानावर घातली. यावेळी ठाकरे गटाचे पदाधिकारी संतोष शिंदे यांनी मॅनेजरला सदर प्रकरणी जाब विचारला. तसेच मॅनेजरला मराठीत बोलायला लावले आणि मराठी लोकांची माफी मागायला लावली.

16 Feb 2025, 14:09 वाजता

न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरणात आणखी एका आरोपीला अटक

न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक  घोटाळा प्रकरणात आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. धर्मेश पौन (58) असे अटक झालेल्या आरोपीचे नाव असून या गुन्हात उन्ननाथन अरुणाचलम उर्फ अरुणभाई हा आरोपी फरार आहे. 122 कोटींपैकी 70 कोटींचा अपहार पौनने केल्याचे तपासात उघड झाले. न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळ्याप्रकरणी बँकेचे जनरल मॅनेजर हितेश मेहता यांना शनिवारी अटक करण्यात आली होती.