Maharashtra Breaking News Today LIVE Updates: शिवसेना मंत्रिमंडळात नवीन चेहऱ्यांना संधी देणार- सूत्र

Maharashtra Breaking News Today LIVE Updates: विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर सत्तास्थापनेच्या दृष्टीने राजकीय घडामोडींना वेग आला असून राज्याला नवीन सरकार कधी मिळणार, मुख्यमंत्री कोण होणार यासंदर्भातील उत्तर आजच मिळतील. दिवसभारतील महत्त्वाच्या अपडेट्स जाणून घ्या एकाच ठिकाणी...

Maharashtra Breaking News Today LIVE Updates: शिवसेना मंत्रिमंडळात नवीन चेहऱ्यांना संधी देणार- सूत्र

24 Nov 2024, 16:56 वाजता

निवडणूक आयोगाचे अधिकारी राजभवनात दाखल

निवडणूक आयोगाचे अधिकारी राजभवनात दाखल झाले आहेत. राज्य निवडणूक आयोगाचे अधिकारी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची भेट घेतील. निवडणूक आयोगाची प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती राज्यपालांना दिली जाणार आहे. निवडून आलेल्या आमदारांची यादी राज्यपालांकडे सोपवली जाणार आहे. त्यानंतर राज्यपालांकडून नवी 15वी विधानसभा अस्तित्वात आल्याचं नोटिफिकेशन काढून सरकार स्थापनेची प्रक्रिया सुरु होईल. 

24 Nov 2024, 16:30 वाजता

महायुतीचा उद्या शपथविधा 

महाराष्ट्राचा मुख्यमंत्र्याचा नावावर आज रात्री शिक्कामोर्तब होणार असं सांगण्यात आलंय.  सोमवारी महायुतीचा शपथविधी होणार असून मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरलाय. त्यासोबत मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लागणार आहे, यावरही विचार झाल्याची माहिती समोर आलीय. 

अधिक माहितीसाठी हे वाचा - Mahayuti Government 2.0 : उद्या शपथविधी... मंत्रिमंडळात 'या' 27 चेहऱ्यांना मिळणार संधी? पाहा कसं असू शकतं नवं Cabinet

 

24 Nov 2024, 16:25 वाजता

निवडणुकीत वंचितचा मविआला फटका

विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला एकही जागा जिंकता आली नाही. मात्र महाविकास आघाडीला वंचितनं जोरदार फटका दिला. खास करुन मराठवाड्यात वंचितमुळे मविआचं मोठं नुकसान झालं. 

 

24 Nov 2024, 15:16 वाजता

उद्धव ठाकरेंनी उद्या बोलवली नवनिर्वाचित आमदारांची बैठक 

उद्धव ठाकरेंनी यांनी सोमवारी 25 नोव्हेंबरला उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नवनिर्वाचित आमदारांची बैठक बोलवली आहे. मातोश्रीवर ही बैठक होणार आहे. दुपारी साडेबारा वाजता नवनिर्वाचित आमदारांची बैठक घेण्यात येणार आहे. 

 

24 Nov 2024, 14:37 वाजता

विजयाचा जल्लोष टाळत जयंत पाटील तातडीने मुंबईला रवाना

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सांगलीतून मुंबईकडे रवाना झाले आहेत. इस्लामपूरमधून वाहनाने जयंत पाटील मुंबईला रवाना झाले आहेत. महाविकास आघाडीच्या पराभवानंतर इस्लामपूर मधील विजयाचा जल्लोष टाळात जयंत पाटलांनी मौन बाळगलं आहे. आज सकाळी ते मुंबईकडे तातडीने रवाना झाले आहेत. ते शरद पवारांची भेट घेण्याची शक्यता आहे.

24 Nov 2024, 13:56 वाजता

पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरण 'त्या' आमदाराला भोवलं; पराभवानंतर अजित पवारांना भेटून...

वडगाव शेरी विधानसभा मतदार संघातील पराभवाची अजित पवारांनी कारणे समजून घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहेत. अजित पवारांच्या पक्षाचे या मतदारसंघातील पराभूत उमेदवार सुनील टिंगरे यांनी अजित पवारांची भेट घेतली. पराभवाला पुणे पोर्शे अपघात प्रकरणाबरोबरच शरद पवार गटातील दिग्गज नेत्यांचा सभांचा फटका बसल्याची माहिती समोर येत आहे. भाजपने देखील या मतदारसंघात काम केलं नसल्याबाबत बैठकीत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

24 Nov 2024, 13:09 वाजता

अजित पवारांवर सोपवण्यात आली मोठी जबाबदारी; राष्ट्रवादीच्या नवनियुक्त आमदारांचा निर्णय

अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावर झालेल्या राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीमध्ये मोठा निर्णय घेण्यात आला आहे. बारामतीमधून मोठ्या फरकाने विजय मिळवल्यानंतर अजित पवारांची आता पक्षाच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे.

 

24 Nov 2024, 12:15 वाजता

महायुतीच्या 6 नेत्यांची विधान परिषदेवर वर्णी लागणार

विधानसभेत डावललेल्या नाराजांना मिळणार विधान परिषदेवर संधी मिळाली आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत परिषदेतील 4 आमदारांची विधानसभेवर वर्णी लागली आहे. त्यामुळं भाजपच्या 4 जागा रिक्त झाल्या आहेत. अनेक नाराज मंडळींपैकी नेमकी कुणाला संधी मिळणार याकडे लक्ष

24 Nov 2024, 12:01 वाजता

एकनाथ शिंदे यांना बंडात साथ दिलेले शिवसेनेचे पाच आमदार पराभूत

सदा सरवणकर
यामिनी जाधव
शहाजीबापू पाटील
संजय रायमूलकर
ज्ञानराज चौगुले

24 Nov 2024, 11:50 वाजता

मुंबईतील हॉटेलमध्ये शिंदेंचे आमदार एकत्र येण्यास सुरुवात

शिवसेना शिंदेंच्या पक्षाचे आमदार मुंबईत यायला सुरूवात. मुंबईच्या वांद्रे येथील ताज अॅन्ड लॅड्समध्ये आतापर्यंत 29 आमदार उपस्थित असल्याची सूत्रांची माहिती आहे. हॉटेलमध्येच सर्व आमदारांच्या उपस्थितीत गटनेता निवडीची बैठक पार पडणार आहे. उपस्थित आमदारांना मुख्यमंत्री मार्गदर्शन करणार आहेत.