Maharashtra Breaking News Today LIVE Updates: अधिवेशनात सहभागी व्हावे; एकनाथ शिंदे यांचे विरोधकांना अवाहन

Maharashtra Breaking News Today LIVE Updates: राज्यातील राजकीय घडामोडींना आज वेग आल्याचं चित्र पहायला मिळेल. एकीकडे विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाची पूर्वतयारी झाली असून दुसरीकडे मंत्रिमंडळ विस्तारात कोणाकोणाला संधी मिळणार याबद्दलची उत्सुकता लागून राहिली आहे. दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचे सर्व अपडेट्स तुम्ही या ठिकाणी पाहू शकता...

Maharashtra Breaking News Today LIVE Updates: अधिवेशनात सहभागी व्हावे; एकनाथ शिंदे यांचे विरोधकांना अवाहन

15 Dec 2024, 17:06 वाजता

शिवसेना आमदार उदय सामंत यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ. 5 वेळा आमदार. मागील सरकारमध्ये उद्योगमंत्री. 

15 Dec 2024, 17:04 वाजता

भाजप आमदार मंगलप्रभात लोढा यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ. 7 वेळा आमदार.  

15 Dec 2024, 17:02 वाजता

राष्ट्रवादीचे परळीचे आमदार धनंजय मुंडे यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ. दोन वेळा आमदार. मागील सरकारमध्ये कृषी मंत्री.   

15 Dec 2024, 17:00 वाजता

 संजय राठोड यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ

15 Dec 2024, 16:58 वाजता

शिवसेना आमदार दादा भुसे यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ. मागील सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री.  

15 Dec 2024, 16:55 वाजता

भाजप आमदार गणेश नाईक यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ. उत्पादन शुल्क मंत्री म्हणून काम केलं पर्यावरण मंत्रीही होते. सामाजिक कार्यासाठी राज्य शासनाचा पुरस्कार. नवीमुंबई महापालिकेत भाजपाची सत्ता आणण्यात मोठं योगदान.  

15 Dec 2024, 16:53 वाजता

शिवसेना आमदार गुलाबराव पाटील यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ.  

15 Dec 2024, 16:51 वाजता

 गिरीश महाजन यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ. जामनेर मतदारसंघ.  7 वेळा आमदार, 10 वर्ष मंत्रिपद भूषपलं. ग्रामविकास, युवा कार्य आणि क्रीडा, वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा या खात्याचं मंत्रिपद त्यांनी भूषवलं. शिक्षकाचा मुलगा आमदार ते मंत्री असा प्रवास.

15 Dec 2024, 16:49 वाजता

भाजप आमदार चंद्रकांत पाटील यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ. मिल कामगाराचा मुलगा, अभाविप कार्यकर्ता ते कॅबिनेट मंत्री असा त्यांचा प्रवास आहे.. उच्च शिक्षण आणि तांत्रिक शिक्षण, कापड, संसदीय कामकाज या खात्याचं काम पाहिलं आहे.  

15 Dec 2024, 16:46 वाजता

राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ. 6 वेळा आमदार. राष्ट्रवादी ग्रामविकास मंत्री होते. कामगार मंत्री म्हणूनही काम पाहिलं. जलसंपदा, विधी आणि न्याय, पशु संवर्धन आणि दुग्ध विकास, शिक्षण खात्यांमध्ये त्यांनी काम पाहिलं..
पश्चिम महाराष्ट्रातले एकमेव अल्पसंख्याक नेते.. गेल्या 40 वर्षांहून अधिक काळ कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात सक्रिय..