Maharashtra Breaking News Today LIVE Updates: अधिवेशनात सहभागी व्हावे; एकनाथ शिंदे यांचे विरोधकांना अवाहन

Maharashtra Breaking News Today LIVE Updates: राज्यातील राजकीय घडामोडींना आज वेग आल्याचं चित्र पहायला मिळेल. एकीकडे विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाची पूर्वतयारी झाली असून दुसरीकडे मंत्रिमंडळ विस्तारात कोणाकोणाला संधी मिळणार याबद्दलची उत्सुकता लागून राहिली आहे. दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचे सर्व अपडेट्स तुम्ही या ठिकाणी पाहू शकता...

Maharashtra Breaking News Today LIVE Updates: अधिवेशनात सहभागी व्हावे; एकनाथ शिंदे यांचे विरोधकांना अवाहन

15 Dec 2024, 07:13 वाजता

आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधांसाठी किती निधी खर्च केला? उच्च न्यायालयाची राज्य सरकारला विचारणा

राज्याच्या आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधांसाठी अर्थसंकल्पात केलेल्या तरतुदींच्या तुलनेत किती निधी वाटप झाले आणि किती खर्च केले ? याचा तपशील सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने शनिवारी राज्य सरकारला दिले. राज्यातील सरकारी रुग्णालये आणि आरोग्य केंद्रांमध्ये वैद्यकीय, निमवैद्यकीय आणि इतर कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांचा तपशीलही न्यायालयाने सरकारला सादर करण्यास सांगितला आहे. अर्थसंकल्पीय तरतुदीनुसार वितरीत केलेला निधी खर्च झाला नसेल किंवा केला नसेल तर तो का केला गेला नाही याची कारणेही प्रतिज्ञापत्रात नमूद करण्याचे आदेश मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठाने सरकारला दिले. उपरोक्त सगळा तपशील जिल्हानिहाय असावा, असेही खंडपीठाने प्रामुख्याने स्पष्ट केले.

15 Dec 2024, 07:13 वाजता

नागपूर : आज संध्याकाळी चहापानाचा कार्यक्रम

नागपूरमध्ये सोमवारपासून सुरु होत असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज संध्याकाळी चहापानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमानंतर महायुतीची पत्रकार परिषद होणार आहे.

15 Dec 2024, 07:11 वाजता

बाबासाहेब पाटील होणार मंत्री?

लातूरमधील अहमदपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबासाहेब पाटील हे आज मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

15 Dec 2024, 07:11 वाजता

गुलाबराव पाटील मंत्रिपदाची शपथ घेणार

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे जळगाव ग्रामीणचे आमदार गुलाबराव पाटील यांना मंत्रिपदाच्या शपथविधी सोहळ्यासाठी विशेष आमंत्रण देण्यात आलं आहे. मात्र त्यांना खातं कुठलं मिळणार हे गुलदस्त्यात आहे. मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी गुलाबराव पाटलांना फोन आल्याची माहिती मंत्री गुलाबराव पाटील यांचे सहाय्यक विश्वनाथ पाटील यांनी 'झी 24 तास'ला दिली आहे.

15 Dec 2024, 07:08 वाजता

नरहरी झिरवाळांना शपथविधीला उपस्थित राहण्याची सूचना

अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार नरहरी झिरवाळांना मंत्रिपद मिळणार असल्याचं सूचित करण्यात आलं आहे. मंत्रिपदाच्या शपथविधीसाठी तयार राहण्याच्या सूचना त्यांना करण्यात आला आहे. कोणते मंत्रिपद याबाबत माहिती देण्यात आलेली नसल्याचं समोर आलं आहे.

15 Dec 2024, 07:08 वाजता

कुर्ला बेस्ट बस अपघात प्रकरण : फॉरेन्सिक अहवाल पोलिसांच्या हाती

कुर्ला बेस्ट बस अपघात प्रकरणातील आरोपी चालक संजय मोरेचा फॉरेन्सिक अहवाल पोलिसांना प्राप्त झाला आहे. अपघाताच्या वेळी संजय मोरे दारू प्यायला नसल्याचं अहवालात नमूद करण्यात आलं आहे. या अपघातामध्ये सात जणांचा मृत्यू झाला असून 42 जण जखमी झालेत. 

15 Dec 2024, 07:04 वाजता

आज महाराष्ट्राला मिळणार 30 ते 32 मंत्री?

विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी आज नागपुरात राजभवनमध्ये दुपारी 4 वाजताच्या सुमारास महायुतीचे अनेक नेते मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. 30-32 मंत्री शपथ घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

15 Dec 2024, 07:04 वाजता

शिंदेंचे 'हे' पाच आमदार आज मंत्रिपदाची शपथ घेणार?

शिवसेनेकडून आज मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या आमदारांची संभाव्य यादी समोर आली आहे. ही पाच नावं खालीलप्रमाणे: 
उदय सावंत
संजय शिरसाट
शंभुराजे देसाई
दादा भुसे
विजय शिवतारे
प्रताप सरनाईक