Maharashtra Breaking News Today LIVE Updates: अधिवेशनात सहभागी व्हावे; एकनाथ शिंदे यांचे विरोधकांना अवाहन

Maharashtra Breaking News Today LIVE Updates: राज्यातील राजकीय घडामोडींना आज वेग आल्याचं चित्र पहायला मिळेल. एकीकडे विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाची पूर्वतयारी झाली असून दुसरीकडे मंत्रिमंडळ विस्तारात कोणाकोणाला संधी मिळणार याबद्दलची उत्सुकता लागून राहिली आहे. दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचे सर्व अपडेट्स तुम्ही या ठिकाणी पाहू शकता...

Maharashtra Breaking News Today LIVE Updates: अधिवेशनात सहभागी व्हावे; एकनाथ शिंदे यांचे विरोधकांना अवाहन

15 Dec 2024, 20:09 वाजता

अधिवेशनात सहभागी व्हावे असे आवाहन एकनाथ शिंदे यांचे विरोधकांना केले आहे. 

15 Dec 2024, 19:11 वाजता

महायुतीच्या शपथविधी सोहळा संपन्न झाला आहे. 39 मंत्र्यांनी शपथ घेतली. भाजप 19, शिवसेना 11 आणि राष्ट्रवादीच्या 9 आमदारांना  मंत्रीपद मिळाले आहे.  मंत्रिमंडळ विस्तारानंतर शिवसेनेत नाराजीनाट्य पहायला मिळत आहे.  शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे नाराज आहेत. 

15 Dec 2024, 18:10 वाजता

महायुतीच्या शपथविधी सोहळा संपन्न झाला आहे. 39 मंत्र्यांनी शपथ घेतली. भाजप 19, शिवसेना 11 आणि राष्ट्रवादीच्या 9 आमदारांना  मंत्रीपद मिळाले आहे. 

15 Dec 2024, 18:04 वाजता

 योगेश कदम यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ. पहिल्यांदाच मंत्री मंडळात समावेश. 

15 Dec 2024, 18:02 वाजता

राष्ट्रवादीचे आमदार इंद्रनील नाईक यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ. 

15 Dec 2024, 17:59 वाजता

भाजप आमदार मेघना बोर्डीकर यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ. दोन वेळा आमदार. पहिल्यांदाच मंत्री मंडळात समावेश. 

15 Dec 2024, 17:57 वाजता

भाजप आमदार पंकज भोयर यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ. 

15 Dec 2024, 17:55 वाजता

 आशिष जैस्वाल यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ. पहिल्यांदाच मंत्री मंडळाच समावेश. 

15 Dec 2024, 17:53 वाजता

भाजप आमदार माधुरी मिसाळ यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ. पहिल्यांदाच मंत्रीमंडळात समावेश. 

15 Dec 2024, 17:51 वाजता

प्रकाश आबिटकर यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ.