15 Dec 2024, 10:20 वाजता
अंबादास दानवेंच्या बंगल्यावर 11 वाजता महाविकास आघाडीची बैठक
ठाकरेंच्या पक्षाचे आमदार अंबादास दानवेंच्या नागपुरमधील बंगल्यावर महाविकास आघाडीची सकाळी 11 वाजता बैठक पार पडणार आहे.
15 Dec 2024, 10:15 वाजता
बेस्ट बसच्या धडकेत घाटकोपरमध्ये दुचाकीस्वाराचा मृत्यू
मुंबईतील घाटकोपर पूर्व येथील शिवाजी नगर जंक्शन बस स्टॉपजवळ बसची धडक बसल्याने डोक्याला दुखापत झाल्याने एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला.
15 Dec 2024, 08:59 वाजता
BJP नेत्यांना मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी फोन येण्यास सुरुवात! पहिला 'या' तिघांना आला कॉल
मंत्रिमंडळामध्ये समावेश करुन घेण्यासाठी भारतीय जनता पार्टीकडून पक्षाच्या आमदारांना फोन करण्यास सुरुवात झाली आहे. नितेश राणे आणि शिवेंद्रसिंह राजे भोसले यांना मंत्रिपदासाठी चंद्रशेखर बावनकुळे यांनी फोन केल्याची माहिती समोर येत आहे. तसेच मंगलप्रभात लोढांनाही मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी फोन आला आहे.
15 Dec 2024, 08:47 वाजता
उद्या मंत्रिपदाची शपथ घ्या; शनिवारी रात्रीच अजित पवारांचा 'या' आमदाराला फोन
राष्ट्रवादी काँग्रेसचे हसन मुश्रीफ आज घेणार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. अजित पवार यांच्याकडून काल रात्री हसन मुश्रीफ यांना फोन आल्याची माहिती समोर येत आहे. हसन मुश्रीफ कोल्हापुरच्या कागलचे आमदार आहेत. ते नवव्यांदा मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.
15 Dec 2024, 07:28 वाजता
देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात होणार जंगी स्वागत
मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचे प्रथमच आज शहरात आगमन होत आहे. त्यांच्या स्वागतासाठी नागपूर सज्ज झाले आहे. नागपूर विमानतळ ते धरमपेठ येथील त्यांच्या निवासस्थानापर्यंत भव्य स्वागत रॅली काढण्यात येणार आहे. त्यांच्या स्वागतासाठी शहरभर होर्डिंग, कटआउट, स्वागत कमानी लावण्यात आल्या आहेत. स्वागत रॅलीच्या मार्गावर ठिकाणी चौका चौकात त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. रस्त्यांवर रांगोळ्या सुद्धा टाकण्यात येणार आहेत. फडणवीस विमानतळावर उतरल्यानंतर ही स्वागत रॅली सुरू होईल. यावेळी फडणवीस विमानतळ परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करतील. त्यानंतर वर्धा मार्गावरील चौकात डॉक्टर हेडगेवार यांच्या स्मारकाला वंदन करतील. त्यानंतर ही स्वागत रॅली देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानापर्यंत जाईल. लक्ष्मीभुवन चौकात देवेंद्र फडणवीस जनतेशी संवाद साधणार आहेत.
15 Dec 2024, 07:21 वाजता
रेल्वेच्या तिन्ही मार्गावर आज मेगाब्लॉक
विविध अभियांत्रिकी आणि देखभाल, दुरुस्तीच्या कामासाठी उद्या, रविवारी मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. त्यामुळे रविवारी रेल्वेचे वेळापत्रक बघूनच घराबाहेर पडा, असे आवाहन करण्यात आले आहे.
पश्चिम रेल्वे मार्गावर बोरिवली ते गोरेगावदरम्यान सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेत 5 तासांचा ब्लॉक घेतला जाणार आहे. या कालावधीत स्लो ट्रकवरच्या ट्रेन बंद करण्यात आल्या असून या गाड्या फास्ट ट्रकवरूनच चालवल्या जाणार आहेत. मध्य रेल्वे मार्गावर विद्याविहार आणि ठाणे स्थानकांदरम्यान पाचव्या आणि सहाव्या लाईनवर सकाळी 8 ते दुपारी 12.30 वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे. काही अप आणि डाऊन मेल/ एक्स्प्रेस गाडय़ांचे डायव्हर्जन केले जाणार आहे. ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई- वाशी भागावर विशेष लोकल चालवण्यात येतील. ठाणे-वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर लाईन सेवा उपलब्ध असेल. पनवेल येथून सकाळी 11.02 ते दुपारी 3.53 वाजेपर्यंत ठाण्याकडे जाणाऱ्या अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि ठाणे येथून सकाळी 10.01 ते दुपारी 3.20 पर्यंत पनवेलकडे जाणाऱया डाऊन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.
15 Dec 2024, 07:19 वाजता
अनेक राज्ये गारठली, थंडी आणखी वाढणार
जम्मू-काश्मीरमधील बहुतांश भागात शनिवारी तापमानात मोठ्या प्रमाणात घट झाली. त्यामुळे पुढील तीन दिवस काश्मीर खोऱ्यात अनेक ठिकाणी थंडीची लाट पसरण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. तापमानात मोठी घट झाल्याने दिल्ली, राजस्थानसह देशातील अनेक राज्ये गारठली असून, नागरिकांना हुडहुडी भरली आहे. काश्मीर खोऱ्यात थंडीची लाट पसरल्याने श्रीनगरमध्ये किमान तापमान उणे 4.6 सेल्सिअस नोंदवले. आदल्या रात्रीच्या तुलनेत हे तापमान दोन अंश सेल्सिअसने कमी होते. गुलमर्गमध्ये उणे 7.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
15 Dec 2024, 07:18 वाजता
सोयाबीन हमीभाव केंद्रांकडे शेतकऱ्यांची पाठ
राज्य सरकारने हमीभावाने सोयाबीन खरेदी करण्याचा निर्णय घेतला; पण खरेदी केंद्र वेळेत सुरू न झाल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीन खुल्या बाजारातच विकले. परिणामी राज्यात 10 डिसेंबरपर्यंत 551 खरेदी केंद्रांवर केवळ 1 लाख 31 हजार टन सोयाबीनची खरेदी झाली. तब्बल 14 लाख टन खरेदीचे उद्दिष्ट ठेवताना शेतकऱ्यांना नोंदणीसाठी 15 डिसेंबरची मुदत देण्यात आली होती; मात्र खरेदी केवळ 10 टक्क्यांपर्यंतच पोहोचल्याने नोंदणीसाठी आता 31 डिसेंबरची मुदतवाढ देण्याची खुल्या बाजाराला दिली पसंती सोयाबीन खरेदी केंद्रे उशिरा सुरू झाली. त्यातच ऐन काढणी वेळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला.
15 Dec 2024, 07:16 वाजता
महाविकास आघाडीची आज बैठक
महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या नेत्यांची आज महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीनंतर हे नेते पत्रकार परिषद घेणार आहेत.
15 Dec 2024, 07:16 वाजता
कमकुवत ‘ला-निना’मुळे भारतात फारशी थंडी नाही?
प्रशांत महासागरात पुढील तीन महिन्यांत ‘ला – निना’ स्थिती विकसीत होण्याची शक्यता आहे. मात्र, ही स्थिती तुलनेने कमकुवत आणि अल्प काळासाठी असल्यामुळे भारतासह जगातील अन्य देशांच्या हवामानावर फारसा परिणाम होण्याची शक्यता नाही, असे मत विविध हवामान संस्था आणि शास्त्रज्ञ व्यक्त करीत आहेत. जागतिक हवामान संस्थेच्या (डब्ल्यूएमओ) ‘ग्लोबल प्रोड्यूसिंग सेंटर्स ऑफ लॉन्ग-रेंज फोरकास्ट्स’ या विभागाने नुकताच एक सुधारित अंदाज जाहीर केला आहे. त्यानुसार, प्रशांत महासागरात पुढील तीन महिन्यांत म्हणजे डिसेंबर ते फेब्रुवारी या काळात ‘ला निना’ची स्थिती विकसित होण्याची शक्यता आहे. मात्र यंदाची ‘ला-निना’ स्थिती मागील ‘ला-निना’च्या तुलनेत कमकुवत असेल, शिवाय ही स्थिती अल्प काळासाठी राहण्याची शक्यता आह