Maharashtra Breaking News Today LIVE Updates: अधिवेशनात सहभागी व्हावे; एकनाथ शिंदे यांचे विरोधकांना अवाहन

Maharashtra Breaking News Today LIVE Updates: राज्यातील राजकीय घडामोडींना आज वेग आल्याचं चित्र पहायला मिळेल. एकीकडे विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाची पूर्वतयारी झाली असून दुसरीकडे मंत्रिमंडळ विस्तारात कोणाकोणाला संधी मिळणार याबद्दलची उत्सुकता लागून राहिली आहे. दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचे सर्व अपडेट्स तुम्ही या ठिकाणी पाहू शकता...

Maharashtra Breaking News Today LIVE Updates: अधिवेशनात सहभागी व्हावे; एकनाथ शिंदे यांचे विरोधकांना अवाहन

15 Dec 2024, 16:45 वाजता

राधाकृष्ण विखे पाटील यांनी  मंत्रीपदाची शपथ घेतलीआहे. 

15 Dec 2024, 16:42 वाजता

भाजप आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.  

15 Dec 2024, 15:40 वाजता

आमदार रवी राणा मंत्रीपदाच्या शर्यतीतून बाहेर - सूत्र 

आमदार रवी राणा यांना मंत्रिपद मिळणार नसल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती 

खासदार नवनीत राणांनी ठेवले हात जोडल्याचे व्हाट्सअप स्टेटस 

माजी खासदार नवनीत राणांच्या व्हाट्सअप स्टेटसची जोरदार चर्चा 

रवी राणा मंत्रिपद मिळत नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी 

आमदार रवी राना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत जवळचे असल्याची ओळख

15 Dec 2024, 15:33 वाजता

राज आणि उद्धव ठाकरे कुटुंब आलं एकत्र

विधानसभा निवडणुकीत एकमेकांवर सडकून टीका केल्यानंतर राज ठाकरे आणि  उद्धव ठाकरे कौटुंबिक कार्यक्रमात ताज लँड्स एन्ड या हॉटेलमध्ये एकत्र आले 

राज ठाकरे यांनी रश्मी ठाकरे यांचे बंधू श्रीधर पाटणकर यांचे पुत्र शौनक पाटणकर यांच्या लग्नात लावली हजेरी 

रश्मी ठाकरे यांच्याकडून राज ठाकरेंचं स्वागत. 

मात्र उद्धव आणि राज ठाकरे यांची थेट भेट थोडक्यात हुकली

उद्धव ठाकरे यांच्यावर टोकाची टीका केल्यानंतरही राज ठाकरेंच्या लग्नातील उपस्थितीतने अनेकांच्या भुवया उंचावल्या

राज - उद्धव एकत्र यावे अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरु असताना राज यांच्याकडून पाटणकर कुटुंबियांच्या निमंत्रणाला मान देत लग्नाला हजेरी लावल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जातंय

15 Dec 2024, 14:48 वाजता

सुधीर मुनगंटीवार यांनाही अद्याप निरोप नाही

आतापर्यंत

चंद्रपूर-- 6 पैकी 5 भाजप आमदार
गडचिरोली-- 3 पैकी 2 महायुती आमदार

या जिल्ह्यांमधून एकाही आमदाराला मंत्रीपदासाठी कॉल नाही.

भाजपचे दिग्गज नेते सुधीर मुनगंटीवार यांनाही अद्याप निरोप नाही.

15 Dec 2024, 14:04 वाजता

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नागपुरात नितीन गडकरींकडून स्वागत 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर प्रथमच नागपुरात आगमन झालं आहे. त्यांची स्वागत यात्रा डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून निघाली यावेळी नागपूरमधील कार्यक्रते आणि सामान्य नागरिकांनी या यात्रेला गर्दी केली होती. ही यात्रा खामला चौकात पोहोचली तेव्हा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि  महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी फडणवीसांचे स्वागत केले. यावेळी फडणवीसांना पुष्पहार सुद्धा अर्पण करण्यात आला. 

15 Dec 2024, 13:29 वाजता

शिवसेनेच्या वाट्याला येणार महत्वाची खाती; गृहनिर्माण, जलसंधारण आणि.... 

नागपूरमध्ये रविवारी सायंकाळी 4 वाजता नव्या मंत्र्यांचा शपथविधी पार पडणार आहे. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,  शिवसेनेच्या वाट्याला गृहनिर्माण , नगर विकास, उद्योग, पर्यटन, शालेय शिक्षण, पाणी पुरवठा, जलसंधारण, मराठी भाषा, माजी सैनिक कल्याण, खनिकर्म, आरोग्य, सार्वजनिक बांधकाम  इत्यादी महत्वाची खाती देण्यात येऊ शकतात. 

15 Dec 2024, 13:29 वाजता

वरळीतील पूनम चेंबर्सला आग 

वरळीतील पूनम चेंबर इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर भीषण आग लागली आहे. शिवसेनेचे (UBT) आमदार आदित्य ठाकरे यांनी घटनास्थळी दाखल होऊन परिस्थतीची माहिती घेतली. अग्निशामक दलाकडून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरु आहे. 

15 Dec 2024, 12:05 वाजता

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपुरात दाखल, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी करणार स्वागत 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर प्रथमच नागपुरात आगमन होत आहे. त्यांची स्वागत यात्रा डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून निघणार आहे. ही यात्रा खामला चौकात पोहोचल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि  महामार्ग मंत्री नितीन गडकरी करणार आहेत.

15 Dec 2024, 11:57 वाजता

संजय बनसोडेंच्या समर्थकांचा राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना हॉटेल रेडिसनमध्ये घेराव

संजय बनसोडे यांना मंत्रीपद मिळणार नसल्याचे स्पष्ट झाल्यानं त्यांच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना हॉटेल रेडिसनमध्ये घेराव घातला. यावेळी संजय बनसोडेही उपस्थित होते. कार्यकर्त्यांनी बनसोडे यांच्या कामाचा पाढा वाचत त्यांना मंत्री करण्याची विनंती केली. रविवारी सायंकाळी नव्या मंत्र्यांचा शपथविधी पार पडणार आहे.