लोकसभा निवडणूक २०१९ : कल्याण लोकसभा मतदारसंघातील रणसंग्राम

२९ एप्रिलला येथे मतदान होणार आहे.

Updated: Mar 26, 2019, 07:34 PM IST
लोकसभा निवडणूक २०१९ : कल्याण लोकसभा मतदारसंघातील रणसंग्राम  title=

कल्याण : कल्याण हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. २०१४ च्या निवडणुकीत शिवसेनेचे श्रीकांत शिंदे, राष्ट्रवादीचे आनंद परांजपे आणि मनसेचे राजू पाटील यांच्यात तिरंगी लढत झाली होती. शिवेसेनेचे श्रीकांत शिंदे यांनी तब्बल २ लाख मतांनी विजय मिळवला. राष्ट्रवादीकडून ठाणे महापालिकेचे नगरसेवक आणि ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आणि माजी अध्यक्ष बाबाजी पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. २९ एप्रिलला येथे मतदान होणार आहे.

२००९ चा निकाल 

शिवसेनेचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांना ४ लाख ४० हजार ८९२, राष्ट्रवादीचे आनंद परांजपे यांना १ लाख ९० हजार २४३ तर मनसेचे राजू पाटील यांना १ लाख २२ हजार ३४९ मते मिळाली होती.

२०१४ निवडणुकीची आकडेवारी

 

उमेदवार

 पक्ष

 मतदान

श्रीकांत शिंदे शिवसेना 440892
आनंद परांजपे राष्ट्रवादी 190143
राजू पाटील मनसे 122349
नरेश ठाकूर आप 20347
दयानंद किरतकर बसपा 19643