Maharashtra Assembly Election 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने प्रचंड बहमत मिळवले आहे. विधानसभेच्या 288 जागांपैकी तब्बल 227 जागा महायुतीनं जिंकल्या आहेत. मुख्यमंत्री कोण होणार याबाबत महायुतीने कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. अशातच महायुतीच्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीची तारीख जाहीर करण्यात आली आहे. 5 डिसेंबरला महायुतीच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
अखेर सरकारच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला आहे. मुंबईच्या आझाद मैदानावर सरकारचा शपथविधी होणार आहे. लवकरच याची अधिकृत घोषणा होणार आहे. दरम्यान, मुंबईत होणारी महायुतीची बैठक पुढे ढकलण्यात आल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. दोन दिवसानंतर महायुतीची बैठक होणार आहे. दिल्लीतून निरोप आल्यावर महायुतीच बैठक होणार असल्याचेही सुत्रांकडून सांगण्यात आले.
महायुतीत काही खात्यांसाठी रस्सीखेच असल्याची सूत्रांची माहिती आहे. दोन खात्यांवर भाजप-शिवसेनेने दावा केला आहे. गृहखात्याची मागणी शिवसेनेनी केली आहे. मात्र, भाजपने यासाठी नकार दिल्याचे समजते. शिवसेना-राष्ट्रवादीत दोन खात्यांसाठी रस्सीखेच पहायला मिळत आहे.
मुख्यमंत्री भाजपचाच होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. शिंदे आणि आणि अजित पवारांनी दिल्लीतील महायुतीच्या बैठकीत प्रस्ताव दिल्याची माहिती. महायुतीच्या बैठकीत एकनाथ शिंदेंना दोन ऑफर देण्यात आल्याची सूत्रांची माहिती. एकनाथ शिंदे यांना 2 ऑफर देण्यात आल्यात. एक म्हणजे डीसीएम आणि दुसर केंद्रात मोठ कॅबिनेट देण्याची ऑफर देण्यात आली. एकनाथ शिंदे यांच्याकडून 12 मंत्रीपदाची मागणी करण्यात आली आहे.
मंत्रिपदात गृह, नगरविकास यासह महत्त्वाच्या खात्यांची शिंदेची मागणी आहे. पालकमंत्री पद देताना देखील पक्षाचा योग्य सन्मान राखावा अशी विनंती एकनाथ शिंदे यांनी अमित शहांना केल्याचेही समजते. विधानसभेच्या 288 जागांपैकी तब्बल 227 जागा महायुतीनं जिंकल्या. यामध्ये एकट्या भाजपनं सर्वात जास्त 131 जागा जिंकत आपण मोठा भाऊ असल्याचं सिद्ध केलं. तर शिवसेनेनं 55 जागांवर विजय मिळवला. त्याचवेळी राष्ट्रवादीनं 41 जागांवर आपला झेंडा फडकवला.