Maharashtra Assembly Elections 2024 : महाराष्ट्राच्या राजकारणातील हायव्होल्टेज लढत मुंबईच्या माहिम मतदार संघात होणार आहे. राज्याच्या राजकारणात आणखी एक ठाकरे मैदानात उतरले आहेत. राज ठाकरे यांचे सुपूत्र अमित ठाकरे माहिम मतदार संघातून निवडणूक लढवणार आहेत. मात्र, त्यांच्यासमोर निवडणूक लढत आहेत ते शिवसेना शिंदे पक्षाचे तगडे उमेदवार सदा सरवणकर. लोकसभेतील मनसेच्या बिनशर्त पाठिंब्याची परतफेड करण्यासाठी महायुतीने मनसेविरोधात उमेदवार देऊ नये अशी मागणी होती. असे असताना सदा सरवणकर निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. सदा सरवणकर यांना भूमिका ठरवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 24 तासांची मुदत दिली होती. मात्र, सरवणकर यांनी आपला निर्णय बदलेला नाही. यामुळे आता शिवसनेने वेगळे पर्याय शोधण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. निवडणूक न लढवता अमित ठाकरेंना मंत्री बनवण्याचा प्लान बनवला जात असल्याची माहिती सुत्रांकाडून मिळाली आहे.
सदा सरवणकर माघार घेत नसल्याने अमित ठाकरेंना विधान परिषदेच्या माध्यमातून आमदारकी दिली जाऊ शकते. अमित ठाकरेंना विधान परिषदेवर घेऊन मंत्री करण्याबाबत शिवसेनेचकडून चाचपणी सुरु आहे. अमित ठाकरे यांच्या मंत्रीपदाबाबतचा प्रस्ताव शिवसेना भाजपकडे ठेवणार आहे. वर्षा बंगल्यावर यासंदर्भात महत्वाची बैठक होणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.
महिम हा मुंबईतील अत्यंत महत्वाच्या आणि ठाकरे गटाच्या बिले किल्ल्याजवळ असलेला मतदार संघ आहे. याच माहिम मतदार संघातून अमित ठाकरे निवडणूक लढवणार आहेत. अमित ठाकरे विरोधात शिंदेंच्या शिवसेनेचे सदा सरवणकर हे निवडणूक लढणार आहेत. तर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने देखील उमेदवारी दिली आहे. दादर माहिममधून शिवसेना ठाकरे गटाच्या महेश सावंत यांची उमेदवारी निश्चित झाली आहे.