Chhagan Bhujbal Karnatak: साल होतं 1986...कर्नाटकमध्ये (Karnataka) हेगडे सरकार सत्तेत होतं. त्यावेळी हेगडे सरकारने कर्नाटक भागात कन्नड भाषेची (kanadi) सक्ती केली. सरकारच्या या सक्तीविरोधात अनेकांनी आक्रमक आंदोलन सुरू केलं. कर्नाटक सरकारच्या विरोधात महाराष्ट्रातील नेते मैदानात उतरले. 4 जून 1986 रोजी छगन भुजबळ यांनी कर्नाटकात वेशांतर करून प्रवेश (Entering Karnataka in disguise) केला. महाराष्ट्रातील अनेक नेत्यांना कर्नाटकची जनता ओळखत होती. त्यामुळे छगन भुजबळांनी (Chhagan Bhujbal) दुबईचे व्यापारी इक्बाल शेख (Iqbal Shaikh) यांची वेशभुषा साकारली. छगन भुजबळ गोवामार्गे कर्नाटकात दाखल झाले आणि शिवसैनिकांच्या मदतीने बेळगावात (Belgaum) पोहोचले. त्यानंतर जो काही राडा झाला तो सर्वांना माहितीच आहे.
अशातच आता महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील वाद पुन्हा पेटला असल्याचं पहायला मिळतंय. बेळगावात (Belgaum) याच मुद्द्यावरून मोठा राडा झाल्याचं पहायला मिळालं. त्यानंतर त्याचे पडसाद महाराष्ट्रातील अनेक शहरात होताना दिसत आहेत. सध्या प्रकरण चांगलंच पेटल्याचं दिसत असताना राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांनी पुन्हा कर्नाटक सरकारला इशारा दिला आहे.
कर्नाटक सरकार (Karnataka Govt) महाराष्ट्राची गावं घेण्याची घोषणा करतंय आणि महाराष्ट्र सरकार बघ्याची भूमिका घेत आहे. त्यांनी कर्नाटक सरकारला कडक समज दिला पाहिजे, असं छगन भुजबळ म्हणाले आहेत. कर्नाटकाने गुंडगिरी थांबवली नाही तर पुन्हा एकदा गनिमी कावा दाखवावा लागेल, असंही छगन भुजबळ म्हणाले आहेत. त्यावरून 35 वर्ष जुन्या घटनेची आठवण भुजबळांनी करून दिली.
आणखी वाचा - कर्नाटक महाराष्ट्र सीमा वाद गंभीर वळणावर; पोलिसांनी घेतला मोठा निर्णय
दरम्यान, आधी बेळगाव, बीदर, भालकी, कारवार इत्यादी गावं महाराष्ट्राला द्या आणि नंतर कांगावा करा, असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला. महाराष्ट्राकडे वाकड्य़ा नजरेने पहाल, तर याद राखा, असा दम देखील भुजबळांनी (Chhagan Bhujbal On Karnatak) यावेळी दिला आहे. कर्नाटकची दादागिरी आणि गुंडगिरी महाराष्ट्र खपवून घेणार नाही. मराठी माणसाला उत्तर देता येत नाही, असं नाही पण कर्नाटकने महाराष्ट्राच्या संयमाचा अंत पाहू नये, असंही छगन भुजबळ म्हणाले आहेत.