मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरेंचीही कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. २ दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचीही कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती.
रश्मी ठाकरे यांची काल रात्री कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली. त्या सध्या वर्षा या शासकीय निवासस्थानीच होम क्वॉरंटाईन झाल्या आहेत.