मुंबई / बुलडाणा : Electricity Bill News : राज्यातील थकीत वीज बिलाचा प्रश्न सोडविण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला आहे. थकीत विद्युत बिलाचा प्रश्न निकाली काढण्यासाठी राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी मोठी घोषणा केली आहे. त्यामुळे राज्यातील वीज ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. (Maharashtra government's big announcement for tired electricity bill customers, took an important decision)
एक रकमी थकबाकी भरल्यास सर्व वीज ग्राहकांना व्याज आणि विलंब शुल्क माफ करण्यात येणार आहे. राज्यातील वीज ग्राहकांसाठी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी लोणार येथे ही मोठी घोषणा केली आहे. दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या नावाने नवी योजना जाहीर करण्यात आली आहे. विलासराव देशमुख अभय योजना ऊर्जा मंत्री राऊत यांनी जाहीर केली आहे.
सोबतच उच्चदाब वीज ग्राहकांना एकरकमी वीज बिल भरल्यास 5 टक्के रकम माफ करण्यात येणार आहे. तसेच लघुदाब वीज ग्राहकांनी एकरकमी वीज बिल भरल्यास 10 टक्के रकम माफ केली जाईल. मात्र कृषि पंप ग्राहकांना दिलासा देण्यात आलेला नाही.