Maharashtra Weather Alert: राज्यात सप्टेंबरमध्ये पाऊस चांगलाच सक्रीय झाला होता. बाप्पाच्या आगमनाबरोबरच पावसानेही जोर धरला होता. कोकणात अधून मधून पाऊस चांगलाच बरसत होता. मात्र, आता पुढील तीन दिवस राज्यात पावसाची उघडीप राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. सोमवारपासून विदर्भात मुसळधार पाऊस बरसू शकतो, असा अंदाजदेखील वर्तवण्यात आला आहे. अनंत चतुर्दशीला पाऊस विश्रांती घेणार असल्याची शक्यता आहे.
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगाल आणि बांगलादेश येथे समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने पावसाने जोर धरला आहे. कोकणात बाप्पाच्या आगमनाबरोबरच पावसानेही चांगली साथ दिली आहे. कोकणात रत्नागिरी, रायगड जिल्ह्याबरोबरच मध्य महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा जिल्ह्यातील घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता वर्तवतानाच यलो अलर्ट देण्यात आला आहे. सोमवारी म्हणजे 16 सप्टेंबर रोजी विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशिम, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली भंडारा या जिल्ह्यांनाही यलो अलर्ट देण्यात आला आहे. अनंत चुतर्दशीला पाऊस काहीशा विश्रांती घेणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
दरम्यान, भारतीय हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार, दि. १ जून २०२४ ते दि. ११ सप्टेंबर २०२४ दरम्यान महाराष्ट्रातील ३६ पैकी २६ जिल्ह्यांमध्ये दीर्घ कालावधीच्या सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे.ह्या २६ जिल्ह्यांपैकी २ जिल्ह्यांमध्ये छत्रपती संभाजीनगर आणि सांगली जिल्ह्यांमध्ये ६६% आणि ६४% इतका जास्त पाऊस झाला असून, हे दोन जिल्हे सामान्य सरासरी पर्जन्यमानापेक्षा सर्वात जास्त विचलन असलेले जिल्हे आहेत. मुंबई उपनगरामध्ये दीर्घ कालावधीच्या सरासरीपेक्षा २०% जास्त अतिवृष्टी झाली असून मुंबई शहर, ठाणे, अमरावती, वाशीम, अकोला, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया आणि भंडारा या जिल्ह्यांमध्ये दीर्घकालीन सरासरीच्या तुलनेत सामान्य पाऊस झाला आहे. तर, हिंगोली ह्या एकमेव जिल्ह्या मध्ये सरासरीच्या तुलनेत -३१% कमी पाऊस झाला आहे. दि. १ जून २०२४ ते दि. ११ सप्टेंबर २०२४ दरम्यान, महाराष्ट्रात एकूण १०६८.६ मिमी पाऊस झाल आहे.
पुणेकरांची तहान भागवणाऱ्या खडकवासला धरणातून सोडण्यात येणारे पाणी रात्री पासून पूर्णपणे बंद करण्यात आले असून संपूर्ण विसर्ग हा आता बंद करण्यात आला आहे. चार ही धरणात 100% पाणीसाठा असल्याने चार ही धरणातील विसर्ग बंद करण्यात आला आहे. पुण्यातील धरणांचा पाणीसाठा पाहूयात.
टेमघर 100%
वरसगाव 100%
पानशेत 100%
खडकवासला 99,16%