रायगड : माथेरान नगरपालिकेत भाजपला मोठा धक्का बसला आहे. त्या 10 नगरसेवकांना जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र ठरवले आहे. रायगड जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या या निर्णयाने भाजपला मोठा झटका लागला आहे.
27 मे रोजी कोल्हापूरला चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या 10 नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. शिवसेना सचिव अनिल देसाई आणि गटनेते प्रसाद सावंत यांनी याबाबत आक्षेप नोंदवला होता. तसेच या नगरसेवकांना अपात्र ठरवण्याची मागणी केली होती. जिल्हाधिकारी यांच्या निर्णयाने भाजपची अडचण वाढली आहे.