पुणे : पुण्यातला सर्वात मोठा टेक फेस्ट समजल्या जाणाऱ्या 'माईंड स्पार्क'ला सुरवात झाली आहे.
पुण्यातल्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या वतीनं आयोजित केल्या जाणाऱ्या या महोत्सवाचं हे अकरावं वर्ष आहे. देशभरातल्या विविध महाविद्यलांतले १२०० हून अधिक विद्यार्थी यात सहभागी झालेत. त्याच बरोबर 'टेक्निकल स्टार्ट अप्स'साठीही हा महोत्सव पर्वणी ठरतोय.
डान्सिंग रोबोट, बॅटरीवर चालणारी सायकल, यासारखे स्टार्ट अप या महोत्सवाचं वैशिष्ट्य ठरताहेत. याखेरीज ५० हून अधिक उपक्रम या महोत्सवात आयोजित करण्यात आले आहेत.