अमरावती : MLA Ravi Rana Police Inquiry : अपक्ष आमदार रवी राणा यांची शाईफेक प्रकऱणी पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे. महापालिका आयुक्त शाइफेक प्रकरणी चौकशीसाठी आमदार रवी राणा यांनी पोलिसांनी नोटीस पाठवली होती. दोन वेळा ते हजर झाले नव्हते. त्यानंतर आज ते पोलिसात हजर झाले. यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे.
अमरावती महानगरपालिका पालिका आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्यावरील शाईफेक प्रकरणी आमदार रवी राणा हे अमरावतीचे सहाय्यक पोलीस आयुक्त भारत गायकवाड यांच्या कार्यालयात हजर झाले. रवी राणा यांना अमरावती पोलिसांनी नोटीस दिल्यानंतर ते पोलीस ठाण्यात दाखल झाले आहे. मात्र यापूर्वी दोन वेळा नोटीस देऊन हजर न झाल्याने आमदार रवी राणा हे हजर राहणार की नाही यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.
पोलिसांकडून रवी राणा यांची चौकशी करण्यात येत आहे. ही चौकशी आणखी किती वेळ सुरु राहणार याकडे लक्ष लागले आहे. अमरावती जिल्हा सत्र न्यायालयाने रवी राणा यांना अटकपूर्व जामीन दिल्यानंतर राणा प्रथमच पोलिसांकडे चौकशीला हजर झालेत. सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालया बाहेर पोलिसांचा कडक बंदोबस्त लावण्यात आला आहे. तसेच परिसरात काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जमावबंदी लागू केली आहे.