सीमावाद प्रश्न अचानक कसा उफाळून आला? राज ठाकरे यांचा सवाल

राज्यपालांना कोण स्क्रिप्ट लिहून देतंय? काहींना पद मिळतं पण पोहोच येत नाही, राज ठाकरेंकडून राज्यपालांवर टीका

Updated: Nov 29, 2022, 06:31 PM IST
सीमावाद प्रश्न अचानक कसा उफाळून आला? राज ठाकरे यांचा सवाल title=

Raj Thackeray Live : सीमा वादाचा प्रश्न अचानक कसा वरती येतो, कोणत्या तरी गोष्टीवरुन लक्ष वळवण्यासाठी हे चालत नाहीए ना, हे नविन येतं कुठून तुमचं संपूर्ण लक्ष त्यावर जावं यासाठी हे सर्व चाललं आहे असा सवाल मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी उपस्थित केला आहे. या राज्यात अशी काही लोकं आहेत मोठ्या पदावर आहेत, पण त्यांना पोहोच नाही, राज्यपाल कोश्यारींबद्दल (Bhagat Singh Koshyari) काय बोलायचं हे कळत नाही, राज्यपालांनाही कोणी स्क्रिप्ट देतं का याबाबत शंका येते, लक्ष वळवण्यासाठी हे सर्व सुरु आहे का? अशी टीका राज ठाकरे यांनी केली आहे. नको त्या लोकांना प्रसिद्धी दिली जाते, हे बंद केलं, तर सर्व गोष्टी आपोआप सुधारतील असा सल्लाही राज ठाकरे यांनी दिला आहे.

राज ठाकरेंचा महाराष्ट्र दौरा
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. राज ठाकरेंचं कोल्हापुरात जंगी स्वागत करण्यात आलं. राज ठाकरेंच्या स्वागताला मोठी गर्दी झाली होती. राज ठाकरेंच्या गाडीला जेसीबीनं हार घालण्यात आला. तब्बल पाच वर्षानंतर राज ठाकरे कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. कोल्हापुरात राज ठाकरे ताराबाई पार्क येथील शासकीय सर्किट हाऊसमध्ये पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. अंबाबाईचं दर्शन झाल्यानंतर ते संध्याकाळी सावंतवाडीमध्ये पोहोचतील. 

शिवसेनेला 19 वर्ष लागली
शिवसेनेचा जन्म 1966 साली झाला. त्या शिवसेनेला 1985 साल उजावडवं लागलं मुंबईत महापालिकेत सत्ता स्थापन करायला. माझ्या पक्षाला आता 16-17 वर्ष झाली आहेत. मी माझ्या पक्षासाठी काम करतोय. पक्षस्थापनेपासून माझ्याबारोबर आलेली लोकं 95 टक्के लोकं नविन आहेत, असं राज ठाकरे यांनी म्हटलंय.

उद्धव ठाकरे यांना टोला
मुख्यमंत्री पदावर असेपर्यंत जी व्यक्ती लोकांना भेटत नव्हती ती व्यक्ती मुख्यमंत्रीपदावरुन दूर झाल्यावर भेटायला लागली. हा विषय आरोग्याचा नाही, आता काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला, ज्या गोष्टी टाळत होते, ते आता सुरु झालंय असा टोला राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता लगावला.