mns adhikrut

मनसेचा मोठा निर्णय, नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात निवडणूक लढणार? उमेदवारही ठरला?

Maharashtra Vidhansabha Election : विधानसभा निवडणुकीसाठी आता सर्वच पक्षांनी तयारी सुरु केली आहे. विधानसभेत महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वबळावर उतरणार आहे. यासाठी मनसेने राज्यभरात उमेदवारांची चाचपणीही सुरु केली आहे.

Sep 30, 2024, 03:33 PM IST

मनसेचं ठरलं... 'महायुतीबद्दल जनतेत नाराजी' असल्याचं सांगत राज ठाकरेंचा मोठा निर्णय! आता...

Maharashtra Politics : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नोव्हेंबर महिन्यात विधानसभा निवडणूक होणार असल्याचे संकेत दिले आहेत. या दृष्टीने आता सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीत थेट लढत असतानाच मनसेनेही स्वबळाची घोषणा केली आहे.

 

Sep 4, 2024, 03:02 PM IST

ठाकरे विरुद्ध ठाकरे हायव्होल्टेज लढत? वरळीत उमेदवार देण्याची राज यांची घोषणा

Maharshtra Politics : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी वरळी मतदारसंघातून उमेदवार देणार असल्याचं स्पष्ट केलय.. त्यामुळे वरळी विधानसभा मतदारसंघात ठाकरे विरुद्ध ठाकरे असा सामना रंगणार याची चर्चा सुरू झालीय.

Aug 24, 2024, 07:41 PM IST

मराठा आंदोलकांच्या राड्यानंतर राज ठाकरेंचा धाराशिव दौरा आटोपता, एका तासात 4 बैठका उरकल्या

Raj Thackeray : मराठा आंदोलकांच्या राड्यानंतर राज ठाकरे यांनी घेतला धाराशिव दौरा आटोपता घेतला आहे. अवघ्या एक तासात राज ठाकरे यांनी चार विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांच्या बैठका उरकल्या. धाराशिवमध्ये राज ठाकरे मुक्कामी असलेल्या हॉटेलला छावणीचं रुप आलं होतं.

Aug 6, 2024, 05:55 PM IST

‘भाजपच्या विनंतीला एकदा मान दिला, पुन्हा-पुन्हा शक्य नाही!’ पदवीधर मतदार संघ निवडणुकीत मनसेचा इशारा

Abhijit Panse:  दरवळेस असे चालणार नाही, असा इशारा मनसे नेत्याने दिलाय. 

Jun 7, 2024, 03:10 PM IST

तुमचं तुमच्या मुलांकडे लक्ष आहे का? ठाण्यात ड्रग्सची सर्रास विक्री...अभिजीत पानसेंची धक्कादायक माहिती

Thane Drugs Racket : ठाण्यात ड्रग्सची सर्रास विक्री होत असल्याची गंभीर माहिती मनसे नेते अभिजीत पानसे यांनी उघड केली आहे.  मुलांना ड्रग्जच्या विळख्यात अडकवण्यासाठी मोठी यंत्रणा कामाला लागलीय, असा दावाही पानसे यांनी केला आहे

May 30, 2024, 03:36 PM IST

कुणाच्या खांद्यावर कुणाचा झेंडा, राज आणि उद्धव ठाकरे कुणाला करणार मतदान? पहिल्यांदाच अशी वेळ

Loksabha 2024 : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मुंबईकर येत्या 20 मे रोजी मतदान करणार आहेत. त्यामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचाही समावेश असणाराय. पण ते दोघे नेमकं कुणाला मतदान करणार? 

Apr 26, 2024, 06:59 PM IST

'फक्त मराठी कलाकारांचं खच्चीकरण करायचं आणि...' चिन्मय मांडलेकरला मनसेचा पाठिंबा

MNS on Chinmay Mandlekar : मराठी अभिनेता चिन्मय मांडलेकरने आपल्या मुलाचं नाव जहांगीर असे ठेवल्याने त्याला ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. याबाबत मनसे चित्रपट कर्मचारी सेनेने चिन्मयला पाठिंबा दर्शवला आहे. 

Apr 22, 2024, 04:39 PM IST

मनसे महायुतीत सामील होणार? गुढीपाडव्याला राज ठाकरे सीमोल्लंघन करणार?

Loksabha 2024 : शिवाजी पार्कवर होणाऱ्या मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे नेमकी काय घोषणा करतात, याकडं सगळ्यांचं लक्ष लागलंय.  महाराष्ट्र नवनिर्माण सेना महायुतीत सामील होणार का? याची चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात रंगली आहे. 

Apr 8, 2024, 09:38 PM IST

राज ठाकरेंची भाजपशी हातमिळवणी? मनसेच्या येण्याने महायुतीला फायदा होणार?

Loksabha 2024 : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आज दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांशी भेट घेतली. तब्बल 30 मिनिटं अमित शाहांशी चर्चा केल्यानंतर राज ठाकरे दिल्लीतून निघाले. या बैठकीचा तपशील समोर आला नसला तरी मनसे महायुतीत सहभागी होणार असल्याचं बोललं जातंय.

Mar 19, 2024, 07:10 PM IST

दिल्लीत अमित शाह आणि राज ठाकरेंमध्ये अर्धा तास चर्चा, मनसेला 'इतक्या' जागा मिळण्याची शक्यता

Loksabha 2024 : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजप नेते अमित शाह यांच्यात दिल्लीत अर्धा तास बैठक झाली. या बैठकीत मनसे एनडीएमध्ये सहभागी होण्यावर चर्चा झाल्याची माहिती मिळतेय. लोकसभेसाठी मनसेला एक जागा मिळण्याची शक्यता आहे. 

Mar 19, 2024, 01:30 PM IST

'राज ठाकरे 25 वर्षात बोलले नाही ते अमित ठाकरे...' वसंत मोरे यांच्या राजीनाम्याचं 'हे' खरं कारण?

Vasant More Resigne : लोकसभा निवडणुकीआधी पुण्यात मनसेला मोठा हादरा बसलाय. पुण्यातील मनसे नेते वसंत मोरे यांनी अखेर मनसेला जय महाराष्ट्र केलाय. वसंत मोरेंनी पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केलीय. त्यासाठी त्यांनी तयारीही सुरू केलीय. तेव्हा वसंत मोरे मनसे सोडून कोणत्या पक्षात जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

Mar 13, 2024, 01:55 PM IST

राज ठाकरे यांचे विश्वासू, कट्टर मनसैनिक, वसंत मोरे कोण? का दिला राजीनामा?

Vasant More : फायरब्रँड नेते अशी ओळख असलेल्या वसंत मोरे यांनी अखेर मनसेला जय महाराष्ट्र, साहेब मला माफ करा असं ट्विट वसंत मोरे यांनी केलंय. पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवण्याची मोरेंची इच्छा आहे. 

Mar 12, 2024, 01:49 PM IST

नाशिकमधून मनसे फुंकणार निवडणुकीचं रणशिंग, काळाराम मंदिरात राज ठाकरेंच्या हस्ते पूजा

MNS Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 18 वा वर्धापन दिन नाशिकमध्ये साजरा केला जाणार आहे. 9 मार्चला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्ताने मनसे लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकणार आहे. 

Mar 8, 2024, 07:12 PM IST

'वेळ आली की फणा काढतातच, पण मी बी पट्टीचा गारुडी आहे' वसंत मोरेंचा रोख कुणाकडे?

MNS in Loksabha Election 2024 : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून लोकसभा निवडणुकीसाठी रणनिती आखली जातेय. याची सुरुवात त्यांनी पुण्यापासू केलीय. पुणे लोकसभा निवडणुकीसाठी पाद पदाधिकाऱ्यांची नावं निश्चित केली असून यातल्या एका नावाची घोषणा केली जाणार आहे. पण त्याआधीत मनसेत कुरबुर सुरु झाली आहे. 

Feb 7, 2024, 04:04 PM IST