मनसे पदाधिकाऱ्याला भर रस्त्यात हॉकीस्टीकने चोपले; मारेकऱ्यांचा शोध सुरु

मनोज कोठारी हे मनसेचे पनवेल उपशहर अध्यक्ष आहेत. कोठारी यांनी बेदम मारहाण करण्यात आली आहे. राजकीय वैमन्यस्यातून हा हल्ला झाल्याचे समजते.

Updated: Nov 5, 2022, 06:52 PM IST
 title=

स्वाती नाईक, झी मिडिया, पनवेल  : राज ठाकरे(Raj Thackeray) यांच्या महाराष्ट्र नव निर्माण सेनेच्या(MNS) पदाधिकाऱ्याला भर रस्त्यात बेदम मारहाण झाली आहे. पनवेल(Panvel) शहरात ही घटनी घडली आहे. मनोज कोठारी(Manoj Kothari) असे मारहाण झालेल्या पदाधिकाऱ्याचे नाव आहे. या मारहाणीत कोठारी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालायत उपचार सुरु आहेत. या घटनेमुळे पनवेलमध्ये एकच खळबळ उडाली आहे. पोलिस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत(Maharashtra Politics).  

राजकीय वैमन्यस्यातून हल्ला

मनोज कोठारी हे मनसेचे पनवेल उपशहर अध्यक्ष आहेत. कोठारी यांनी बेदम मारहाण करण्यात आली आहे. राजकीय वैमन्यस्यातून हा हल्ला झाल्याचे समजते.

हॉकीस्टीक आणि लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण 

मिलींद खाडे नावाच्या वक्तीने आपल्या तीन साथीदारांच्या मदतीने मनोज कोठारी यांच्यावर हल्ला केला. कोठारी यांना हॉकीस्टीक आणि लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली आहे.
या मारहाणीत मनोज कोठारी जंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

कामोठे पोलिसांनी या प्रकरणात मिलींद खाडे आणि त्याच्या तीन साथीदारांविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिस या चौघांचा शोध घेत आहेत.  उपशहर प्रमुख पद दिल्याने हा हल्ला केल्याचा आरोप मनोज कोठारी यांनी केला आहे.