लग्न करणाऱ्यांसाठी गूड न्यूज, आषाढ आणि त्यानंतरही शूभ मुहूर्त

अडचणीच्या प्रसंगी काढलेले हे मुहूर्त आहेत.

Updated: Jul 17, 2021, 09:49 PM IST
 लग्न करणाऱ्यांसाठी गूड न्यूज, आषाढ आणि त्यानंतरही शूभ मुहूर्त title=

विशाल करोळे, झी २४ तास, औरंगाबाद  : राज्यात कोरोनाच्या लाटेपासून (Corona Virus) कडक लॉकडाऊन लावण्यात आला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात निर्बंध लावण्यात आले. लॉकडाऊनमुळे अनेकांना मोठा फटका बसला. विशेष म्हणजे ज्यांचं लग्न या  लॉकडाऊनमध्ये नियोजित होतं, त्यांना नाईलाज म्हणून लग्न स्थगित करावं लागलं. पण त्यानंतर चांगला मुहूर्त नसल्याने काही जणांची लग्न अजून झालेली नाहीत. अशा समस्त लग्नाळू मंडळींसाठी गूड न्यूज आहे. (muhurat for marriage in 2021 to get married to month of Ashadh to ashwin)

आषाढ, श्रावण, भाद्रपद आणि अश्विन महिन्यातही लग्नाचे मुहूर्त असल्याचं  पंचागकर्तै सांगतायेत. शास्त्रानं सुद्दा या मुहूरर्तांना योग्य सांगितलं आहे, त्यामुळं रखडलेल्या लग्नांचा आता खुशाल बार उडवून दोनाचे चार हात करण्याची संधी आहे. यंदा आषाढ श्रावण , भाद्रपद आणि अश्विन महिन्यातही लग्नाचे भरपूर  मुहूर्त आहेत. पंचांगात याला आपात्कालीन मुहूर्त म्हणतात.

आषाढ 7 मुहूर्त

श्रावण 11 मुहूर्त

भाद्रपद 3 मुहूर्त

आश्विन 6 मुहूर्त

अडचणीच्या प्रसंगी काढलेले हे मुहूर्त आहेत. सगळे पंचांगकर्ते 2019 मध्ये एकत्र आले आणि त्यांनी असे मुहूर्त काढण्याच्या निर्णय घेतला. या असल्या मुहूर्तांनी आता लग्न मंगल कार्यालय चालकही खुश आहेत. या महिन्यांतही लग्न झालं तर व्यवसाय सावरायलाही मदत होईल. त्यामुळे अर्थव्यवस्थेा चालणा ही मिळेल.