'सासूला म्हणाला, बघाना ही मरत पण नाही', नागपूर हत्याकांडाची ऑडिओ क्लीप

नागपुरामधल्या पाच जणांच्या हत्याकांडाचा उलगडा

Updated: Jun 24, 2021, 06:47 PM IST
'सासूला म्हणाला, बघाना ही मरत पण नाही', नागपूर हत्याकांडाची ऑडिओ क्लीप  title=

अमर काणे, झी 24 तास, नागपूर : क्रूरकर्मा आलोक माटूरकरनं आपल्याच कुटुंबातील 5 जणांच्या केलेल्या हत्याकांडाप्रकरणी पोलिसांच्या हाती एक ऑडिओ क्लीप लागली आहे. 27 मिनिट 16 सेकंदांची ऑडिओ क्लीपमध्ये आलोक, मेव्हणी आमिषा आणि सासू यांच्यातील संवाद रेकॉर्ड झाला आहे. प्रेम, वासना आणि त्यानंतर निघृणपणे आलोकनं मेव्हणी आणि सासूची हत्या केल्याचे या ऑडिओ क्लीपमध्ये आहे. धक्कादायक म्हणजे आमिषाची गळा चिरल्यानंतर ती मरत असताना तिची आई (आलोकची सासू) तिथे पोहचली. सासूनं लक्ष्मीबाई यांनी जावई तुम्ही काय केले असं म्हटलं, यावर निर्दयी आलोकनं बघाना ना मरत पण नाही असं निष्ठूरपणे म्हटलं. त्यानंतर सासूचाही गळा चिरून खून केला.

27 मिनिटांची ऑडिओ क्लिप
अंगाचा थरकार उडवणाऱ्या नागपूरमधल्या पाचपावली इथल्या माटूरकर-बोबडे कुटुंबातील हत्याकांडप्रकरणी एका ऑडिओ क्लीपमुळं उलगडा करण्यास मदत होतेय. आलोकविरुद्ध मेव्हुणी आमिषानं काही दिवसांपूर्वी पोलिसांत तक्रार दिली होती. आमिषा दुसऱ्या व्यक्तीच्या प्रेमात पडल्याच्या संशयातून आलोकनं तिला मारहाण केली होती. तेव्हापासून दोघांमधील संबंध ताणले होते. 

आलोक आणि आमिषामध्ये झाला वाद
आलोक ज्यावेळी आमिषाच्या घरीपोहचला त्यावेळी मेव्हणी आमिषानं टकल्या आला असा टेक्स मॅसेजची एका मित्राला टाकला होता. अलोक आणि आमिषामध्ये गेल्या काही दिवसात खटके उडत असल्यानं आमिषानं तो आल्याबरोबर मोबाईलमधील ऑडिओ रेकॉर्डिंग सुरु केलं. सुरुवातीला दोघांमध्ये प्रेम, वासनेचा संवाद झाला. त्यानंतर तिसऱ्या मिनिटाला शिविगाळ आणि वाद सुरु झाला. आठव्या मिनिटाला आलोकनं निर्दयपणे चाकूने आमिषाचा गळा कापल्याचं ऑडिओ क्लीपमधून समोर आलं आहे. 

सासूचीही केली हत्या
हा सर्व प्रकार घडत असतानाच सासू लक्ष्मीबाई बोबडे तिथे पोहचल्या. त्यांनी जावई तुम्ही काय केलं हे असं बोलल्या. त्यावर क्ररकर्मा आलोकनं मोठ्यानं ओरडू नका असं बजावत त्यांचीही गळा चिरून हत्या केल्याचं 17 व्या मिनिटाला रेकॉर्डिंग आहे. हे कृत्य केल्यानंतर आलोकनं त्यांच्या मृतदेहावर चादर टाकली. सासूरवाडीला त्याच्या हा कृत्याची पूर्ण 27 मिनिटांची ऑडिओ क्लीप पोलिसांच्या हाती लागली आहे...त्यामुळं याप्रकरणाचा उलगडा करण्यास पोलिसांना मदत होणार आहे..

आलोकने स्वत:च्या मुलांनाही सोडलं नाही
घरी आल्यानंतर आलोकने पत्नी विजया माटूरकर, मुलगी परी माटूरकर (14 वर्ष), मुलगा साहिल माटूरकर (12 वर्ष) यांचीही हत्या केली. त्यानंतर त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. आलोक पाचपावली परिसरात रंभाजी रोड बागल व्यायाम शाळेजवळ भाड्याच्या घरात राहत होता. तर सासू आणि मेव्हणी त्यांच्या घरापासून 100 मीटर दूर पटवी गल्ली इथं रहात होते. आलोकने काल रात्री सासू आणि मेव्हणीची हत्या केली. त्यानंतर घरी येऊन पत्नी आणि मुलांची हत्या करत गळफास लावून आत्महत्या केली.