Nanded News : नांदेडच्या शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात (Nanded Govt. Hospital) 48 तासांत 31 रूग्णांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली होती. राजकीय पक्षांनी या घटनेवरुन सरकारला धारेवर धरलं आहे. मृतांमध्ये 16 बालकांचा समावेश असल्याने हे प्रकरण आणखीनच तापलं आहे. औषधांचा तुटवडा असल्यामुळे रुग्णांचा मृत्यू झाल्याचा दावा केला जात आहे. दुसरीकडे, शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील (Hemant Patil) यांनी रुग्णालयाच्या अधिष्ठातांना स्वच्छतागृह साफ करायला लावल्याने खळबळ उडाली होती. मात्र याप्रकरणी शिंदे गटाच्या खासदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.