नाशिक : त्र्यंबकेश्वर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष विजया लढ्ढा यांच्याविरुद्ध १३ नगरसेवकांच्या स्वाक्षरीने शनिवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे .
प्रारूप आराखडा परस्पर मंजूर करण्याचे प्रकरणात हरीत पट्ट्यातील भूखंड पिवळी करण्याचा उद्योग या नगराध्यक्ष महोदयांनी केला होता.
इतकेच नाही तर मुख्याधिकाऱ्यांना न सांगता आराखड्यावर स्वाक्षरी करून घेण्याचा प्रयत्न केल्याने मुख्याधिकारी चेतना मानुरे - केरूरे यांनी जिल्हा प्रशासनाला तक्रार केली होती.
या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारीना नगराध्यक्षांचे पती हे उद्योग करत असल्याने हा अविश्वास आणण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात तो दाखल करून घेतला असून, नूतन अध्यक्ष निवडीची सभा जिल्हाधिकारी केव्हा बोलवतात याकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागले आहे.