नाशिक : मराठवाड्याचा दुष्काळ मिटवण्यासाठी राज्य सरकारने एक पाऊल पुढे टाकलंय. नदीजोड प्रकल्पाच्या माध्यामतून उत्तर महाराष्ट्र मराठवाड्याचा दुष्काळ मिटणार असल्याचा दावा गिरीश महाजन यांनी केलाय. या संदर्भात गेल्या काही दिवसापासून वरिष्ठ पातळीवर बैठकांचे सत्र सुरु असून आराखडा तयार केला जात असून केंद्र सरकर या प्रकल्पासाठी १२ ते १५ हजार कोटी रुपये देणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
राज्यामध्ये यंदा पावसाने चांगला जोर धरलाय. राज्यभरातील धरण साठ्यात वाढ होत असून धरणसाठा ३५ टक्क्याव पोहचलाय. मागील वर्षीच्या तुलनेत पाणीसाठ्यात तीन टक्याने वाढ झाल्याची माहिती महाजन यांनी दिलीय.