पुण्यात पुन्हा एकदा हिट अँड रन; तब्बल 20 दिवसानंतर उघडकीस आला थरारक अपघात

पिंपरी चिंचवडमध्ये एका भरधाव कारने महिलेला उडवलंय.. 23 मे रोजी झालेल्या या भीषण अपघाताचं सीसीटीव्ही आता समोर आलंय.. 

वनिता कांबळे | Updated: Jun 11, 2024, 09:50 PM IST
पुण्यात पुन्हा एकदा हिट अँड रन; तब्बल 20 दिवसानंतर उघडकीस आला थरारक अपघात title=

Pune Hit And Run Accident : पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे. त्यातच आता पुण्यात पुन्हा एकदा हिट अँड रनची घटना घडली आहे. तब्बल 20 दिवसानंतर हा थरारक अपघात उघडकीस आला आहे. या अपघाताचे CCTV फुटेज व्हायरल झाले आहे. एका तरुणीला भरधाव कारने उडवल्याचे CCTV फुटेजमध्ये दिसत आहे. या अपघातात एक तरुणी गंभीर जखमी झाली आहे.  

पिंपरी चिंचवड शहरात  एकदा हिट अँड रन अपघात घडला आहे. हिंजवडी मधल्या भुजबळ रस्त्यावर 23 मे रोजी सायंकाळी 5 सुमारास हा अपघात घडला आहे. या अपघातात एका बेधुंद कार चालकाने रस्त्याकडेने चालणाऱ्या युवतीला 20 फूट उडवल आहे. अपघाताचा हा सर्व थरार  CCTV कॅमेऱ्यात कैद झाला आहे. 

या अपघातात तरुणी जखमी झाली आहे. या प्रकरणात हिंजवडी पोलिसांनी आरोपी विरोधात सध्या तरी गुन्हा दाखल केला नाही आहे. या अपघातातील जखमी महिला मुंबईचे असल्याने तिने अजून पर्यंत हिंजवडी पोलीस स्टेशन मध्ये आपली तक्रार दाखल केली नाही. तरुणीची तक्रार आल्यानंतर आम्ही आरोपी विरोधात योग्य ती कायदेशीर कारवाई करू असं हिंजवडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात यांनी  सांगितल आहे.

दरम्यान पुणे अल्पवयीन आरोपी कार अपघात प्रकरणी, तिघांना 14 जूनपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. अल्पवयीन मुलाची आई आई शिवानी अग्रवाल, वडील विशाल अग्रवाल यांच्यासह अशफाक मकानदर यालाही 14 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अग्रवाल दाम्पत्याला मदत केल्याचा आरोप अशफाकवर आहे. अल्पवयीन मुलाच्या रक्ताच्या नमुन्यात फेरफार केल्या प्रकरणी, कोर्टात सुनावणी झाली. त्यावेळी त्यांना 4 दिवसांची वाढीव पोलीस कोठडी देण्यात आली. 19 मे रोजी पुण्यातील कल्याणीनगर परिसरात  भरधाव पोर्शे कारने बाईकला धडक दिली. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला.

नागपूरच्या हिट अँड रन केसमध्ये धक्कादायक खुलासा 

नागपूरच्या हिट अँड रन केसमध्ये धक्कादायक खुलासा समोर आला आहे. संपत्तीच्या हव्यासापोटी सुनेनंच सास-याच्या हत्येची 1 कोटी रुपयांना सुपारी दिल्याचं, पोलीस तपासात उघड झालं. विशेष म्हणजे सुपारी म्हणून तब्बल 1 कोटी रुपये, तसंच जागेसहित बारचं लायसन्स देण्याचं ठरलं होतं. सासरे पुरुषोत्तम पुट्टेवार यांच्या कोट्यवधी रुपयांच्या संपत्तीवर सूने अर्चना पुट्टेवार हिचा डोळा होता. यासाठी तिनं नव-याच्या ड्रायव्हरलाच हत्येची सुपारी दिली होती. तर 17 लाख रुपये ऍडव्हान्स म्हणून दिले गेले होते. त्यानुसार नागपूरच्या बालाजी नगर परिसरात झालेल्या 22 मे रोजी पुरुषोत्तम पुट्टेवार यांना गाडीखाली चिरडण्यात आलं. त्यात त्यांचा मृत्यू झाला. हा सारा प्रकार अपघात म्हणून दाखवण्यात आला. मात्र नागपूर क्राईम ब्रँचच्या युनिट चारनं कसून तपास करुन, सूत्रधार सून अर्चनासह 3 आरोपींना बेड्या ठोकल्या. विशेष म्हणजे अर्चना पुट्टेवार या गडचिरोलीच्या नगररचना विभागात सहाय्यक संचालक आहेत. त्यामुळे संपत्तीसाठी त्यांनी जे कृर कृत्य केलंय त्यावरुन नागपूरकरांनी संताप व्यक्त केलाय.