दीपक भातुसे, प्रतिनिधी, झी मीडिया : हिवाळी अधिवेशनात सरकारला घेरण्यासाठी विरोधकांनी कंबर कसली आहे. 'हे न्हवं माझं सरकार' असे बॅनर विरोधी पक्षाच्या संयुक्त पत्रकार परिषदेत लावले.
मागील तीन वर्षातील सरकारच्या कामाचे विरोधकांनी वाभाडे काढले. अधिवेशनात शेतक-यांचे प्रश्न विरोधकांच्या केंद्र स्थानी असणार आहेत. यानिमित्तानं उद्यापासून सुरू होणा-या नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात आक्रमक होण्याचे विरोधकांनी एक प्रकारे संकेतच दिलेत.