मुंबई / कल्याण : राज्यात कोरोनाचा उद्रेक (Coronavirus) दिवसागणिक वाढत असल्याने राज्य सरकारने 144 कमल लागू करत कडक संचारबंदी केली आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सरकारने पाऊल उचलण्यास सुरुवात केली आहे. मात्र, असे असताना कोरोना बाधितांचा आकडा वाढत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त होत आहे. मुंबईसह उपनगरातही कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. यामुळे अनेक ठिकाणी बेड उपलब्ध होत नसल्याचे (No Empty beds in hospital) दिसून येत आहे. कल्याणमध्ये परिस्थिती बिकट झाली आहे. बेड नसल्याने रुग्णालयाच्या व्हरांड्यातच ऑक्सिजन लावून उपचार (No Empty beds in hospital, oxygen treatment on verandah) करण्याची वेळ आली आहे. (Outbreak of corona in Kalyan-Dombavali)
कल्याणाच्या रुक्मिणीबाई रुग्णालयातील धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. बेड अभावी रुग्णांचे हाल होत आहेत. रुग्णालयाच्या व्हरांडयातच रुग्णांना ऑक्सिजन लावून उपचार करण्यात येत आहेत. कल्याण आणि डोंबिवलीत कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असल्याने रुग्णालयात रुग्णांना बेड मिळणे कठिण झाले आहे.
रुक्मिणीबाई रुग्णालयात आणि पालिकेच्या कोविड सेंटरमधील सर्व बेडस भरले गेले आहेत. बेड खाली नसल्याने रूग्णालयाच्या व्हरांडयातच रुग्णाला ऑक्सिजन लावण्याची वेळ आली आले. त्यामुळे कल्याण डेांबिवलीची परिस्थिती खूपच गंभीर होत असल्याचे दिसून येत आहे.
याबाबत आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी संशयीत रुग्णांवर रिपोर्ट येण्यापूर्वी उपचार केले जात आहे. ज्यांना ऑक्सिजनची गरज आहे. त्यांना ऑक्सिजन दिला जात आहे. रुग्णांचा जीव वाचविणे हे आमच्या दृष्टीने महत्वाचे असल्याचे सांगितले तर उद्या टास्क फोर्सची बैठक घेतली जाणार आहे. वेबीनॉरच्या माध्यमातून खाजगी रुग्णालयाशी संपर्क साधून इंजेक्शन, बेड, ऑक्सिजनची उपलब्धता याचा आढावा घेतला जाणार असल्याचे सांगितले.