डहाणू आणि जव्हारमध्ये मतदानाला सुरूवात

सर्वच राजकीय पक्षांनी प्रतिष्ठेची केलेल्या या दोन्ही नगरपरिषदेच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागलंय. 

Updated: Dec 17, 2017, 11:01 AM IST
डहाणू आणि जव्हारमध्ये मतदानाला सुरूवात  title=

पालघर : पालघर जिल्ह्यातील डहाणू नगरपरिषद आणि जव्हार नगर परिषदेच्या निवडणूक मतदानाला सकाळपासून सरूवात झालीए.

मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झालीय. सर्वच राजकीय पक्षांनी प्रतिष्ठेची केलेल्या या दोन्ही नगरपरिषदेच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागलंय. 

डहाणूत ३२ हजार मतदार 

डहाणू नगरपरिषदेत सध्या भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत चुरस आहे.  नगराध्यक्ष पदासाठी ७ उमेदवार रिंगणात आहेत. तर २५ नगरसेवक जागांसाठी ११० उमेदवार रिंगणात आहेत. डहाणू नगर परिषदेत एकूण ३२ हजार मतदार आहेत. 

जव्हारमध्ये ८ हजार मतदार 

तिकडे जव्हार नगरपरिषदेवर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि काँग्रेस या पक्षात खरी लढत असून नगराध्यक्ष पदासाठी ५  उमेदवार  रिंगणात  आहेत.

तर १७ नगरसेवकांच्या जगासाठी ६६ उमेदवार उभे आहेत. जव्हार नगर परिषदेत ८ हजार मतदार आहेत.

या दोन्ही नगरपरिषदांवर कुणाची सत्ता येणार हे सोमवारी होणा-या मतमोजणीनंतर स्पष्ट होईल.