Petrol Diesel Price on 17 Jan 2024 : आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमतीत किरकोळ चढ-उतार होत आहेत. आज (17 जानेवारी 2024) सकाळी 6 वाजता डब्ल्यूटीआय कच्चे तेल प्रति बॅरल $ 71.91 पर्यंत घसरले. तर ब्रेंट क्रूडची किंमत 78.29 प्रति बॅरलवर थोडी जास्त आहे. भारतीय तेल विपणन कंपन्या दररोज सकाळी पेट्रोल आणि डिझेलचे नवीनतम दर जाहीर करतात. त्यानुसार महाराष्ट्रात पेट्रोल डिझेल महागले की स्वस्त झाले ते जाणून घ्या...
मे 2023 ते आतापर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाली असून देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी घट होणार? याकडे सर्वसामान्यांचंही लक्ष लागलं होते. मात्र आजही भारतीय तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल केलेला नाही.
महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दरात बदल झाला असून दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 90.08 रुपये प्रति लिटर आहे. तर कोलकाता पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर आणि चेन्नईत पेट्रोल 106.31 रु. आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर आहे. त्याचबरोबर छत्तीसगडमध्ये पेट्रोलच्या दरात 60 पैशांनी तर डिझेलच्या दरात 59 पैशांनी घट झाली आहे. तर महाराष्ट्रात पेट्रोल 39 पैशांनी तर डिझेल 38 पैशांनी स्वस्त झालं आहे. तर उत्तर प्रदेशात पेट्रोल आणि डिझेल 20 पैशांनी महागले आहे.
- मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर
- पुण्यात पेट्रोल 106.17 रुपये आणि डिझेल 92.68 रुपये प्रति लिटर
- ठाण्यात पेट्रोल 106.01 रुपये आणि डिझेल 92.50 रुपये प्रति लिटर
- नाशिकमध्ये पेट्रोल 106.54 रुपये आणि डिझेल 93.05 रुपये प्रति लिटर
- नागपूरमध्ये पेट्रोल 106.04 रुपये आणि डिझेल 92.59 रुपये प्रति लिटर
- कोल्हापूरमध्ये पेट्रोल 106.09 रुपये आणि डिझेल 92.64 रुपये प्रति लिटर
तुमच्या मोबाईलवर IndianOil ONE मोबाईल अॅप डाउनलोड करून, तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑइल पेट्रोल पंपावर इंधन दर जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx या वेबसाइटवर पेट्रोल डिझेलची किंमत सहज पाहता येईल. पेट्रोल आणि डिझेलचे दर एसएमएसद्वारेही कळू शकतात. इंडियन ऑइलच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, तुम्हाला तुमचा शहर कोड टाकून 92249992249 किंवा 92249992249 वर एसएमएस पाठवावा लागेल आणि त्यानंतर आरएसपी आणि स्पेस द्या. होय कोड इंडियन ऑइलच्या वेबसाइटवर उपलब्ध असेल.