नागपूर -पोलिस म्हटले की त्यांचा धाक, दंडुका असं चित्र साधारणपणे आपल्या डोळ्यासमोर येतं.मात्र ल़ॉकडाऊन दरम्यान खाकीवर्दीतील देवमाणूसही अनेकदा दिसला. आता नागपुर पोलिसांचं संवदेशीलपणा पुन्हा एकदा दिसून आला.गेल्या काही दिवसंपासून शहरात कडाक्याची थंडी आहे. त्यामुळं नागपूरकर गारठले आहेत.मात्र रस्त्यावर राहणा-यांचे थंडीमुळे प्रचंड हाल होताय.अंथरण्यासाठी चादर नाही, अशा या गरिबांची अवस्था,परिस्थिती पाहून पोलीस उपायुक्त लोहित मतानी अशा नागरिकांच्या मदतीला सरसावले. अशा गरजू नागरिकांसाठी उपायुक्त मतानी यांनी ब्लँकेटचे वाटप करून मायेची ऊब दिली.
शहरातील कायदा सुव्यवस्था राखतांना पोलिसांच्या खाकीतील माणुसकीचे दर्शन पुन्हा एकदा नागपुरात दिसून आलं. गुन्हेगारांना पोलीस खाक्या दाखवणा-या पोलिसांच्या सामाजिक कार्याचे दर्शन देणारी घटना नागपुरात नुकतीच दिसून आली. सध्या थंडीमुळं घराबाहेर गरम कपडे घातल्याशिवाय पडणे अवघड झालेय.अशा थंड वातावरणात बोचणा-या थंडीमुळे बेघर गरीब लोकांची मोठे हाल होत आहेत.
एकीकडे घर नाही त्यात अंथरण्यासाठी साधी चादरही नाही. त्यामुळं अख्खी रात्र कुडकुडत कशीबशी त्यांनी काढावी लागते..त्यांची ही फरवट ,वेदना पाहून पोलीस उपायुक्त लोहित मतानी त्यांच्या मदतीसाठी सरसावले.शहरात गस्त घालत असताना मतानी यांना थंडीत कुडकुडणारे असे नागरिक आढळले. त्यांनी अशा बेघर,गरीब गरजू व्यक्तींना ब्लँकेट देण्यासाठी पुढे आले.
वर्धा मार्गावरील साई मंदिर परिसरात तसेच फुटाळा तलाव परिसरात 50 ब्लँकेट्सचे त्यांनी गरजूंना वितरण केलं.ब्लॅकेटरुपी मायेच्या उब मिळाल्यानं बेघरांना थंडीपासून बचावासाठी मोठा आधार मिळाला आहे.
वयोवृद्ध गरीब महिलेच्या गळणा-या झोपडीला स्वखर्चातून टाकून ताडपत्री
शांती नगर येथील एका महिलेच्या झोपडीतून पावसाळ्यात पाणी गळतं होतं. घरात पाणी शिरल्यामुळं तिथं राहणं मुश्किल झालं होतं. गळक्या घरात राहिल्यामुळं आजारी पडण्याचीही भीती होती.यादरम्यान सुरक्षा व्यवस्थेची पाहणी करताना पोलिस उपायुक्त मतानी यांना र्मदा बावनकुळे या 70 वर्षीय आजी त्यांच्या झोपडीत भिजताना दिसल्या.त्यांची व्यथा लक्षात आल्यानंतर मतानी यांनी स्वखर्चानं ताडपत्रीची व्यवस्था केली. एवढ्यावरच मतानी थांबले नाहीत तर त्यांनी स्वतः ताडपत्री तिच्या
झोपडीवर टाकून दिली.