सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे: शाळेच्या गेटवरच शिक्षिकेचा विनयभंग झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना समोर येताच परिसरात खळबळ माजली आहे. दरम्यान पोलिसांना ही पोलिसांनी तात्काळ कारवाई केली असून आरोपींना ताब्यात घेतले आहे. पण ज्या शाळेत आपण विद्यार्थ्यांना शिकविणार त्या शाळेच्या गेटवरच असा प्रकार घडल्याने शिक्षिकेला जबर मानसिक धक्का बसला आहे. या शिक्षिका मिठानगर येथील एका प्राथमिक शाळेत पीटी टीचर म्हणून काम करतात. पुण्यात घडलेल्या या घटनेत तिघांनी शिक्षिकेचा विनयभंग तर केलाच पण तू शाळेत जायचे नाहीस अशी धमकी देखील तिला दिली. त्यामुळे प्रकरण अधिकच चिघळले आहे.
पुण्यातील कोंढवा भागातील प्राथमिक शाळेतून हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे शिक्षिका म्हणून काम करणार्या ३६ वर्षीय शिक्षिकेसोबत विनयभंगाचा प्रकार समोर आला आहे. या महिलेला शाळेच्या गेटवरच अडविण्यात आले. त्यानंतर तिचा हात हातात घट्ट पकडून विनयभंग करण्याचा प्रयत्न करण्यात आला. याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विनयभंग करणाऱ्या तिघे शिक्षिकेचा हात पकडण्यावरच थांबले नाहीत तर त्याही पुढे जाऊन त्यांनी तिला धमकी दिली. तू शाळेत जायचे नाही असे या तिघांनी धमकावल्याचे पीडित तरुणीने पोलिसांना सांगितले. याप्रकरणी कोंढवा पोलिसांत विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
३६ वर्षीय पीडित शिक्षिकेने दिलेल्या तक्रारीवरुन कोंढवा पोलिसांनी जुबेर रशीद खान ( वय ४५, रा. नाना पेठ), आजहर खान (वय ३८) आणि अफाक अन्सार खान (वय ४०) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मागील दोन आठवड्यापासून शाळेची प्रिन्सिपल आणि त्यांचा भाऊ जुबेर खान यांच्या शाळेच्या प्रॉपर्टीवरून वाद सुरू आहेत. त्यातून हा प्रकार झाल्याचे उघड झाले आहे. ५ जुलै रोजी तक्रारदार या नेहमीप्रमाणे शाळेत जात होत्या. त्यावेळी शाळेच्या गेटवर जुबेर खान हा इसम आला. त्याने तक्रारदार शिक्षिकेचा हात पकडून विनयभंग केला. तसेच शाळेत न जाण्याची धमकी दिली. तू शाळेत जायचे नाही नाहीतर, आम्ही तुला मारणार अशी जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार महिलेने केली आहे.