पुणे : पार्किंगमध्ये गाडी उभी करताना बऱ्याचदा पाहिलं जात नाही. कधीकधी नो पार्किंगमध्येही गाड्या पार्क करून सऱ्हाईतपणे चालक निघून जातात. पार्किंगचे नियम मोडणाऱ्या उस्तादांसाठी आता कठोर कारवाई आणि दंड लावण्यात येणार आहे. त्यामुळे गाडी पार्क करताना नियम मोडणार नाहीत याची काळजी घ्या नाहीतर खिशाला मोठी कात्री लागू शकते.
पुण्यामध्ये पार्किंगचे नियम न पाळणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. नियम मोडला तर खिशाला कात्री बसू शकते. पुण्यात नो पार्किंगच्या दंडात वाढ करण्यात आली आहे. सम विषम दिनांक न पाहता मोटारी तसेच दुचाकी लावणाऱ्या वाहनचालकांना याचा मोठा फटका बसणार आहे.
त्यामुळे तुम्ही जर पुण्यात जात असाल आणि पार्किंगमध्ये गाडी उभी करणार असल किंवा मित्राची जरी गाडी असेल तरी काळजी घ्या. सुधारित कायद्यानुसार दंड, टोईंग चार्ज आणि जीएसटी मिळून मोटारसायकल स्वारांना चांगलाच फटका बसणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार आता ७८५ रुपये दंड भारावा लागणार आहे.तर चारचाकी वाहनांसाठी हे शुल्क 1 हजार 71 रुपये भरावे लागणार आहेत.