Pune Porsche Accident: 'तो चालक नव्हे मानवी बॉम्ब आहे,' मृत तरुणाच्या कुटुंबाचा संताप, 'आधी त्याच्या आई-वडिलांना...'

Pune Porsche Accident: पुण्यातील पोर्शे कारने दिलेल्या धडकेत मृत्यू झालेल्या तरुणाच्या मामाने संताप व्यक्त केला आहे. आरोपी अल्पवयीन मुलगा मानवी बॉम्ब आहे अशा शब्दांत त्यांनी संतापाला वाट मोकळी करुन दिली. तसंच जामीन देताना लावण्यात आलेल्या अटी हास्यास्पद असल्याची टीका केली आहे.   

शिवराज यादव | Updated: May 20, 2024, 09:42 PM IST
Pune Porsche Accident: 'तो चालक नव्हे मानवी बॉम्ब आहे,' मृत तरुणाच्या कुटुंबाचा संताप, 'आधी त्याच्या आई-वडिलांना...' title=

Pune Porsche Accident: पुण्यातील पोर्शे कारने दिलेल्या धडकेत अनिस दुधिया या तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. 17 वर्षीय तरुणाने बेदरकारपणे गाडी चालवत धडक दिल्याने अनिस आणि त्याच्या मैत्रिणीला जीव गमवावा लागला. मात्र पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर 15 तासातच त्याला जामीन मंजूर करण्यात आला. आरोपीला जामीन देताना ठेवण्यात आलेल्या अटींवर अनिसच्या मामाने नाराजी जाहीर केली आहे. तसंच आरोपी हा मानवी बॉम्ब आहे अशा शब्दांत संताप व्यक्त केला आहे. 

आरोपी अल्पवयीन असून पुण्यातील प्रसिद्ध बिल्डरचा मुलगा आहे. त्याने दिलेल्या धडकेत अनिस दुधिया आणि अश्विनी कोष्टा यांचा जागीच मृत्यू झाला. धडक इतकी भीषण होती की, दोघेही हवेत उडाले होते. यानंतर तेथील नागरिकांनी आरोपी तरुणाला चोप देत पोलिसांच्या हवाली केलं होतं. दरम्यान कोर्टाने रस्ते अपघात आणि त्यावरील उपाय या विषयावर 300 शब्दांचा निबंध लिहिणे, वाहतूक पोलिसांना 15 दिवस मदत या अटींवर त्याला जामीन मंजूर केला. 

पुणे स्पोर्ट्स कार अपघाताचं धक्कादायक CCTV आलं समोर; पाहून अंगावर काटा येईल

 

अनिस दुधियाचे मामा अखिलेश अवधिया यांनी यांनी जामीन देताना ज्या अटी ठेवण्यात आल्या आहेत त्या हास्यास्पद असल्याचं म्हटलं असून, महाराष्ट्र पोलिसांवर योग्य कारवाई न केल्याने संताप व्यक्त केला आहे. त्यांनी इंडिया टुडेशी संवाद साधताना म्हटलं की, "हे आयपीसी कलम 304 (अविचारी किंवा निष्काळजीपणाने एखाद्याच्या मृत्यूला कारणीभूत ठरणं) हा गुन्हा आहे. नवीन कायद्यानुसार, शिक्षा सात वर्षांची असायली हावी. जामिनाच्या अटी हास्यास्पद आहेत. इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनाही ते शिकवलं जातं. तो 3 कोटींचा कार चालवत होता. फक्त एका व्यावसायिकाचा मुलगा असल्याने त्याची सुटका कऱण्यात आली आहे".

"तो एक मानवी बॉम्ब आहे. त्याची जर सुटका कऱण्यात आली तर तो उद्या आणखी कोणाची हत्या करुन पळून जाऊ शकतो. त्याच्या वडिलांनी त्याला कार चालवायची परवानगी दिलीच कशी? त्याच्या आई-वडिलांना कोर्टात आणलं पाहिजे," असा संताप त्यांनी व्यक्त केला आहे.

नेमकं काय घडलं?

पुण्यातील कल्याणी नगर परिसरात एका आलिशान सुपरकारने रात्री अडीच वाजताच्या सुमारास दोघांना उडवलं. हे दोघेही पीडित आपल्या दुचाकीवर होते. धडक इतकी भीषण होती की, दोघे हवेत उडाले आणि दुसऱ्या एका कारवर जाऊन पडले. यानंतर कार रस्त्याच्या शेजारी जाऊन धडकली आणि तिथेच थांबली. यानंतर तिथे उपस्थित नागरिकांनी चालकाला चोप दिला. दरम्यान घटनास्थळावरचं एक सीसीटीव्ही समोर आलं असून यामध्ये कार किती वेगात होती हे स्पष्टपणे दिसत आहे.

पोलिसांनी येरवडा पोलिस स्टेशनमध्ये कलम 306 (आत्महत्येला प्रवृत्त करणे), कलम 279 (सार्वजनिक मार्गावर बेदरकारपणे वाहन चालवणे), 304 (अ) (निष्काळजीपणामुळे मृत्यू होणे), 337 (जीवाला किंवा इतरांच्या सुरक्षेला धोका निर्माण करणं), 427 (दुर्घटना करणे) आणि मोटार वाहन कायद्याच्या इतर तरतुदींनुसार गुन्हा दाखल केलं.