पुणे : 'पराभवाच्या भीतीने राहुल गांधी अमेठी बरोबरच वायनाडमधूनही निवडणूक लढवत आहेत. मात्र वायनाडमध्ये ही त्यांचा पराभव होणार आहे. त्यामुळे पुढील निवडणूकीत राहुल गांधींना शेजारच्या देशातील सुरक्षित मतदारसंघ शोधावा लागेल.' असा उपरोधिक टोला केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी राहुल गांधी यांना लगावला आहे.
पुण्यात लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आयोजित व्यापारी मेळाव्यानंतर ते बोलत होते. 'चौकीदर चोर है यावरून सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना आधीच नोटीस बाजवली आहे. आता याची निवडणूक आयोगानं दखल घेतली आहे. मात्र काँग्रेस आणि राहुल गांधी ७० वर्ष खोटाच प्रचार करत आले आहेत.' असा आरोप गोयल यांनी केला आहे.
'मुकेश अंबानी यांनी मिलिंद देवरा यांना पाठिंबा दिल्यानंतर भाजपला आता देशातील गरिबांची आठवण झाली आहे. देशातील करोडपती आणि सावकार काँग्रेसला पाठिंबा देत असले तरी देशातील १३० कोटी जनता भाजप बरोबर आहेत.' असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
>