मुंबई : Unseasonal Rain in Maharashtra :राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचे संकट येणार आहे. आधीच झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटने शेतकरी अडचणीत आला आहे. आता पुन्हा पावसाचा इशारा देण्यात आल्याने शेतकरी धास्तावला आहे. मुंबईसह पश्चिम महाराष्ट्र, कोकणात अवकाळी पाऊस पडेल, अशी शक्यता भारतीय हवामान विभागाने व्यक्त केली आहे. (Mumbai, Maharashtra Unseasonal Rain)
22 जानेवारी आणि 23 जानेवारी या दोन दिवसात पाऊस पडेल. उद्या आणि परवा गारपीट होण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रात थंडी कायम आहे. तसेच विदर्भात आणि मराठवाड्यात गारपीट पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.डिसेंबर महिन्यात आणि जानेवारीच्या सुरुवातीला मुंबईसह महाराष्ट्रात अवकाळी पाऊस पडला. या अवकाळी पावसामुळे हिवाळ्यात सगळ्यांचीच गैरसोय झालेली पाहायला मिळाली. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात चांगला पाऊस झाला. तर आठवड्यापूर्वी जोरदार पाऊस आणि गारपीट झाली. त्यामुळे शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान झाले आहे.
कोकणात झालेल्या पावसामुळे फळांचा राजा संकटात आला आहे. नाशिक, पुणे जिल्ह्यातही पाऊस पडल्याने याचा फटका द्राक्ष, कांद्याला फटका बसला होता. आता पुन्हा पावसाचा इशारा दिल्याने शेतकरी चिंतेत आहे. अवकाळी पावसाबरोबर गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागाने विर्तविली आहे.
कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील काही दिवसात पाऊस पडेल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. महाराष्ट्र किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा तयार झाला आहे. दक्षिण कोकण- गोवा ते दक्षिण मध्य महाराष्ट्रापर्यंत हा पट्टा सक्रिय आहे. त्यामुळे राज्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे.