नागपुरात भव्य राम नवमीला भव्य शोभायात्रा

 राम नवमीच्या पार्श्वभूमीवर नागपुरात भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. 

Jaywant Patil Updated: Mar 26, 2018, 01:39 AM IST
नागपुरात भव्य राम नवमीला भव्य शोभायात्रा title=

नागपूर : राम नवमीच्या पार्श्वभूमीवर नागपुरात भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. पोद्दारेश्वर राम मंदिरातून संध्याकाळी निघालेली शोभायात्रा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने नागपूरकर रस्त्यांवर आले होते. पोद्दारेश्वर राम मंदिरातून गेले ५२ वर्ष पारंपारिक पद्धतीने शोभायात्रा काढली जाते. एका रथावर श्रीराम, सीता आणि लक्ष्मणच्या प्रतिमा ठेऊन तो रथ नागरिक हाताने ओढतात. 

नागपूरची सांस्कृतिक आणि सामाजिक ओळख

शहरातील वेगवेगळ्या मार्गातून जाणारी ही शोभा यात्रा नागपूरची सांस्कृतिक आणि सामाजिक ओळख बनली आहे. 

राज्यातील नागरिकांना रामनवमीच्या शुभेच्छा

आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित  आणि नागपूरचे महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते पूजन झाल्यानंतर शोभायात्रेला सुरुवात झाली. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यातील नागरिकांना रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या.