मुंबई : राज्यात अनेक जिल्ह्यात जोरदार पाऊस (Heavy rain) कोसळत आहे. कोकणात मुसळधार पाऊस कोसळत आहे. रत्नागिरीत आज रेड अलर्ट देण्यात आला आहे.( Red alert in Ratnagiri) याठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज असूनर रायगड, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, साताऱ्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात गेला आठवडाभर चांगला पाऊस कोसळत आहे. आज रत्नागिरीमध्ये आज मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्याचबरोबर रायगड, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, साताऱ्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, पालघर, औरंगाबाद, जालना या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे.
मुसळधार पावसामुळे परभणीच्या सेलू तालूक्यातील निम्न दुधना प्रकल्पात आतापर्यंत 84 टक्के पाणी साठा झाला आहे. पाण्याची आवक वाढल्याने धरणाचे 20 पैकी 14 दरवाजे 0.30 मीटरने वर करण्यात आले आहेत. दुधना नदीवरील वालुर सेलू आणि मंठा सेलू जाणाऱ्या मार्गावरील पुल तसंच सातोना केदारवाडीचा पुल पाण्याखाली गेल्याने जवळपास 20 गावांचा संपर्क तुटला आहे.
हवामान खात्याच्या वर्तविण्यात आलेल्या अंदाजानुसार आज वाशिम जिल्ह्यातील रिस ोड, मालेगाव,मानोरा, कारंजा तालुक्यात अनेक ठिकाणी सकाळ पासून संततधार पाऊस सुरू आहे. दुपार नंतर पावसाने जोरदार सलामी दिली. काही वेळ मुस ळधार पाऊस झाला.जिल्ह्यातील मेघ गर्जनेसह पाऊस कोसळला असल्याने नद्या, नाल्यां भरून वाहत आहेत.
पावसाच्या लहरीपणामुळे धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये पेरण्या रखडल्या आहेत. त्याचा परिणाम हा कृषी अर्थव्यवस्थेवर ही दिसून येतोय. गेल्या काही दिवसांपासून पोऊस होत असला तरी त्याच्या लहरीपणामुळे शेतकरी अन्य पिकांना प्राधान्य देत आहेत. त्यामुळे बियाणं खरेदी केली असली तरी शेतकऱ्यांनी खत खरेदीकडे सध्या पाठ फिरवली आहे.