मुंबई : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी राजकारणात चांगलचं वादळ निर्माण झालं आहे. विरोधी पक्षांकडून सतत वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. वनमंत्री संजय राठोड आज राजीनामा देण्याची शक्यता वर्तवण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राठोड यांना राजीनामा देण्याचे आदेश दिले आहेत. तर विदर्भातून होणार नव्या वनमंत्र्याची निवड होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एकंदर परिस्थिती पाहता पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण संजय राठोड यांना भोवणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी भाजपने आक्रमक भुमिका घेतली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अर्थसंकल्पीय कामकाज होऊ देणार नाही, इशारा देखील दिला आहे. त्यामुळे आता संजय राठोड राजीमाना देतील का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 1 मार्चपासून अधिवेशन सुरू होत आहे. राठोडामुळे अधिवेशनात गदारोळ होणार अशी चर्चा देखील सुरू आहे.
पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणानंतर भाजप नेतेही राठोड यांच्या राजीनाम्यावर आक्रमक झाले आहेत. राजीनामा घेतल्याशिवाय अधिवेशन चालू देणार नाही असा इशारा देण्यात विरोधीपक्ष भाजपने दिला आहे. तर भाजपपाठोपाठ शिवसेनेतही राठोडांच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढत चालला आहे. विदर्भातल्या कार्यकर्त्यांनी राजीनामा घेण्याबाबत आक्रमक भूमिका घेतली.