विनायक मेटेंच्या मृत्यूबाबत खळबळजनक गौप्यस्फोट

शिवसंग्रामचे कार्यकर्ते अण्णासाहेब माळकर यांनी मेटेंच्या अपघाताबाबत मोठा दावा केला आहे.

Updated: Aug 16, 2022, 11:46 AM IST
विनायक मेटेंच्या मृत्यूबाबत खळबळजनक गौप्यस्फोट  title=

मुंबई : शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष आणि माजी आमदार विनायक मेटे यांंचा अपघातामध्ये मृत्यू झाला होता. या अपघाताबाबत अनेकांनी घातपात असल्याचा संशय व्यक्त केला होता. अशातच मेटेंच्या अपघाताचा याआधीही प्रयत्न झाला असल्याचा दावा शिवसंग्रामचे कार्यकर्ते अण्णासाहेब माळकर यांनी झी 24 तासच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना केला आहे. 

काय म्हणाले अण्णासाहेब मायकर?
3 ऑगस्टला मी साहेबांसोबत होतो, शिक्रापूर येथे  2.5 किमी आमच्यापुढे आयशर गाडी होती. तेव्हा एक चार चाकी गाडीही होती, त्यामध्ये दोन ते चारजण होते. त्या गाडीने आम्हाला दोन वेळा कट मारला. गाडी पुढे घेण्यासाठी आम्हाला हात करत होते. त्यावेळी साहेब म्हणाले, गाडी आयशर मागेच असूद्यात आपल्याला मीटिंगला उशिर झाला आहे. तेव्हा आम्ही बीडहून मुंबईला निघालो होतो. याबाबत दुसऱ्या दिवशी भाचा आकाश जाधव याच्याशी चर्चा केली असल्याचं मायकर यांनी सांगितलं.   

 विनायक मेटे यांच्या घातपाताबाबत चर्चा सुरू होती मात्र आता मायकर यांनी केलेल्या गौप्यस्फोटामुळे वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे. मेटेंच्या गाडीचा चालकानेही आपल्याला मदत मिळायला उशिर झाल्याचं म्हटलं होतं. मेटे यांचा मुंबईकडे येत असताना खालापूर टोलनाक्याजवळ त्यांच्या गाडीला अपघात झाला होता.  

 

दीपाली सय्यद यांनीही केला होता संशय व्यक्त- 
समाजासाठी लढणारे नेत्यांचे सुवर्णकाळ सुरू होण्याच्या वेळीच कसे अपघात होतात, आणि नेहमी चालकच कसे जखमी होत नाहीत, कदाचित यांचा मास्टर माईंड एकच असू शकतो, शोध अपुर्ण नसावा, शहानिशा झालीच पाहिजे. महाराष्ट्राचे खुप मोठे नुकसान होत आहे अशा घातपाताने.

दरम्यान, मेटे यांच्या अपघातासाठी कारणीभूत ठरलेल्या फरार ट्रक चालकाला पोलिसांनी गुजरातमधील दमन इथं अटक केली आहे. आता मेटे यांच्या गाडीचा चालक आणि ट्रकचालक यांची समोरासमोर चौकशी होणार आहे.